Nilesh Rane : निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तृतीयपंथीयाच्या तक्रारीवरून पोलीस कारवाई

टीम लय भारी

जळगाव : वाट्टेल तशी विधाने करणे माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane ) यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांच्यावर जळगाव येथील फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.

निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘हिजडा’ असा केला होता. त्यामुळे तृतीयपंथी समुदायामध्ये संताप पसरला होता. त्या अनुषंगाने शमीभा पाटील या तृतीयपंथी व्यक्तीने निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 499 व 501 अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. तृतीयपंथी (हिजडा) समुदायावर उपहासात्मक टिप्पणी करून अब्रुनुकसान व मानहानी केल्याचा आरोप राणे ( Nilesh Rane ) यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी अदखलपात्र हा सौम्य स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

निलेश राणे व आमदार रोहित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विट युद्ध सुरू आहे. रोहित पवार यांच्यावर राणे यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करणारे ट्विट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले होते. तनपुरे यांच्या या ट्विटमुळे राणे भडकले.

जाहिरात

भडकलेल्या राणेंनी ( Nilesh Rane ) तनपुरे यांच्यावर अभद्र शब्दांत वार केले. त्यात त्यांनी तृतीयपंथीयांचाही उल्लेख केला. राणे यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत सारंग पुणेकर या तृतीयपंथी व्यक्तीने बुधवारी संताप व्यक्त केला होता.

‘हिजडा’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. हे वक्तव्य मागे घ्या, नाहीतर तुमचा बाजार उठवेन अशी तंबी सारंग पुणेकर यांनी दिली होती. त्यानंतर जळगाव येथील पाटील या व्यक्तीने निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Police case registered against Nilesh Rane at Jalgaon

VIDEO : माफी मागितली नाही, तर राज्यभरात गुन्हे दाखल करणार

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे ठरले, म्हणून अजितदादांनी बंड केले

Nilesh Rane : निलेश राणेंना तृतीयपंथियाने भरला दम, ‘बाजार उठविण्याची’ दिली तंबी

Nilesh Rane ‘पवारांवर बोलण्याअगोदर निलेश राणेंनी वडीलांचा सल्ला घ्यावा’

Rane VS Pawar : निलेश राणेंनी शरद पवारांना डिवचले, रोहित पवारांवरही खालच्या पातळीवरील टीका

निलेश राणे यांचे वादग्रस्त ट्विट

तुषार खरात

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

57 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago