33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयAjit Pawar : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे ठरले, म्हणून अजितदादांनी बंड केले

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे ठरले, म्हणून अजितदादांनी बंड केले

टीम लय भारी

मुंबई : सहा महिन्यांपूर्वी अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. सुप्रिया सुळे यांना अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद, तर जयंत पाटील यांना गृह खात्यासह उपमुख्यमंत्री द्यायचे निश्चित झाले होते. या कारणामुळे नाराज झालेल्या अजितदादांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्याचे आता समोर आले आहे.

वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी ‘चेकमेट’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामध्ये अजितदादांच्या बंडामागील रहस्य उघड करण्यात आले आहे. त्यावेळी राज्यात मोठे राजकीय घमासान झाले होते. पडद्यामागे अनेक महत्वाच्या घडामोडी घडत होत्या.

Rane Vs Pawar

पडद्यामागील अचंबित करणाऱ्या घडामोडी आता सुधीर सुर्यवंशी यांनी पुस्तकरूपाने लोकांसमोर आणल्या आहेत. Checkmate : How the BJP won and also lost the Maharashtra असे या पुस्तकाचे नाव आहे.

अजितदादांनी ( Ajit Pawar ) नक्की का बंड केले याबाबत सामान्य लोकांमध्ये अजूनही कुतूहल आहे. बंडांमागे असलेल्या कारणांची माहिती चेकमेट पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.

पहिल्या अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु नंतरच्या अडिच वर्षांसाठी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवले जाणार होते. एवढेच नव्हे तर, जयंत पाटील यांना गृहमंत्री पदासह उपमुख्यमंत्री पद दिले जाणार होते. त्यामुळे अजितदादा ( Ajit Pawar ) कमालीचे नाराज झाले होते.

आपल्याला डावलले असून त्यामुळे राजकीय करिअरच उद्ध्वस्त होऊ शकेल, अशी भीती अजित पवारांना वाटत होती. अजितदादांसाठी ( Ajit Pawar ) हा निर्णय धक्कादायक होता.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार बनविण्याचा निर्णय पक्का झाला होता. मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना देण्याचे ठरले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ( Ajit Pawar ) सुद्धा तणावाखाली आले होते.

देवेंद्र फडणवीस व अजितदादांनी 23 नोव्हेंबर रोजी राजभवनवर शपथ घेतली, त्याच्या आदल्या रात्री बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची बैठक वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये झाली होती.

रात्री उशिरा ही बैठक संपवून अजितदादा ( Ajit Pawar ) आपल्या गाडीने घरी निघून गेले. त्यानंतर घरातून गाडीने पुन्हा बाहेर पडले. गाडी मध्येच थांबवून ते उतरले व ड्रायव्हरला घरी जायला सांगितले. अजितदादांनी दुसरी गाडी पकडली.

तिकडे देवेंद्र फडणवीस आपला गाड्यांचा ताफा सोडून खासगी वाहनातून वांद्र्याच्या दिशेने गेले. फडणवीस व अजितदादा ( Ajit Pawar ) सोफिटल हॉटेलमध्ये मागच्या दाराने गुप्त ठिकाणी गेले. तिथे त्यांची सविस्तर चर्चा झाली.

Ajit Pawar
जाहिरात

‘महाविकास आघाडी’ सरकार बनण्याचे घाटत असल्यामुळे फडणवीस खूपच अस्वस्थ झाले होते. ‘महाविकास आघाडी’ सरकार बनण्याच्या अगोदर आपण सरकार स्थापन करूया असा फडणवीस ( Ajit Pawar ) यांनी अजितदादांकडे आग्रह धरला. अजितदादांनी थोडे थांबण्याचा सल्ला दिला. परंतु देवेंद्र फडणवीसांनी आग्रह कायम ठेवला.

त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी शपथविधी आयोजित करण्याचे ठरले. अजितदादांनी 38 आमदार फोडण्याची तयारी केली होती. हा सगळा प्रकार त्यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व धनंजय मुंडे यांना सांगितला होता. भाजपसोबत जाणे योग्य ठरणार नाही असा सल्ला मुंडे यांनी अजितदादांना दिला होता.

अजितदादांबरोबर राष्ट्रवादीतून येणाऱ्या 38 आमदारांपैकी 20 जणांना मंत्रीपदे देण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली होती. उरलेल्या आमदारांना म्हाडा, सिडको यांसारखी महामंडळे दिली जाणार होती.

या फोडाफोडींची शरद पवार यांना सुतराम कल्पना नव्हती. शरद पवार यांना याबाबत काहीही माहित पडणार नाही, याची काळजी अजितदादांनी ( Ajit Pawar ) घेतली होती. पवारांना माहित झाले, तर ते आमदारांना बंड करण्यापासून रोखतील असे अजितदादांना वाटत होते. त्यामुळे अजितदादांनी ( Ajit Pawar ) खबरदारी घेत या सगळ्या घडामोडी पवारांपासून लपवून ठेवल्या होत्या.

सुधीर सुर्यवंशी यांनी हे पुस्तक इंग्रजीतून लिहिले असून ते ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

MLA Rohit Pawar : डोळ्यात पाणीच येणार, चिमुकलीने आमदार रोहित पवारांशी साधलेला संवाद नक्की ऐका

Governor : शरद पवारांच्या नाराजीनंतरही राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी

अजितदादांनी भाजपला फटकारले

Focus : जयंत पाटलांची अवस्था : घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी

पुस्तक खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी