राजकीय

Congress President Election: गांधी परिवारातून कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष बनणार नाही – अशोक गहलोत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे आगामी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही. राहुल गांधीनीं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कळविले आहे की, गांधी परीवारातर्फे कोणीही निवडणूक लढवणार नाही. शुक्रवारी केरळमध्ये माध्यमांना संबोधित करताना गहलोत म्हणाले की, मी  राहुल गांधीना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी अनेक वेळा विनंती केली आहे. परंतु राहुल गांधीनी स्पष्ट केले आहे की, गांधी परिवारातून कोणीही अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही.

लवकरच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे गहलोत यांनी सांगितले. देशाची सद्यस्थिती लक्षात घेता विरोधी पक्ष मजबूत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा –

Dussehra Melava: दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार; न्यायालयाचा मोठा निर्णय

Viral Video : दारू पिलेल्या प्राध्यापकाचा विद्यापीठात राडा!

Viral Video : साराच्या व्हायरल व्हिडिओने सिनेसृष्टी हादरली!

अशोक गहलोत आणि पक्षाचे खासदार शशी थरूर हे आगामी निवडणुकीचे संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. तथापि, देशभरातील काँग्रेस समित्या बैठका घेत आहेत ज्यात “आम्ही येणार्‍या काँग्रेस अध्यक्षांना PCC आणि AICC सदस्यांची नियुक्ती करण्यास अधिकृत करतो” असा ठराव मंजूर केला जात आहे.

पक्षाचा पाठिंबा असूनही, स्वतः राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी घेण्याच्या निर्णयावर मौन बाळगले आहे. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल असे संकेत दिले आहेत की, “मी (काँग्रेसचा) अध्यक्ष होतो की नाही हे अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर स्पष्ट होईल.”

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

7 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

8 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

10 hours ago