35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनViral Video : दारू पिलेल्या प्राध्यापकाचा विद्यापीठात राडा!

Viral Video : दारू पिलेल्या प्राध्यापकाचा विद्यापीठात राडा!

व्हिडिओ पठाणकोटच्या गुरु नानक देव विद्यापीठाचा (गुरु नानक देव विद्यापीठ, पठाणकोट, पंजाब) आहे. येथील एका प्राध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मद्यधुंद अवस्थेत वर्गात दिसत आहे.

आपण अनेकदा आपल्या शैक्षणिक आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना देवाचा दर्जा देत असतो. बऱ्याचदा काही शिक्षकांना देवापेक्षाही उच्च स्थान दिले जाते. अनेक विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधत विशेष उपक्रम आयोजित करत असतात. मात्र, जर एखाद्य शिक्षकानेच विद्येच्या आवारात अपमानास्पद कृत्य केल्यास काय होईल? या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबमधील एका प्राध्यापकाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पठाणकोटच्या गुरु नानक देव विद्यापीठाचा (गुरु नानक देव विद्यापीठ, पठाणकोट, पंजाब) आहे. येथील एका प्राध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मद्यधुंद अवस्थेत वर्गात दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्राध्यापक वर्गात आपल्या विद्यार्थ्यांसोबत पंजाबी भाषेत बोलतांना दिसत आहेत. रविंदर कुमार असे या प्राध्यापकाचे नाव असून तो येथील गणित विद्याशाखेचा भाग आहे. व्हिडिओमध्ये काही वेळानंतर प्रोफेसर पंजाबी गाणे गातानाही ऐकू येतात आणि त्याचवेळी ते डान्स करतानाही दिसत आहेत. दरम्यान, वर्गात बसलेले विद्यार्थी त्यांचे मनोबल वाढवताना ऐकू येतात.

हे सुद्धा वाचा…

Ravikant Varpe : ‘मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात’

World Cinema Day : आता केवळ 75 रुपयांत सिनेमागृहात पाहता येणार सिनेमा

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

नशेत असलेल्या प्राध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होताच, युजर्स या शिक्षकाची जोरदार निंदा करत आहेत, तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ शेअर करत आहेत, त्यामुळे या शिक्षकाच्या कृत्याचा हा व्हिडिओ संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आता यावर विद्यापीठ आणि प्रशासन काय कारवाई करते हे पाहायचे आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय या व्हिडिओचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला देखील धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मनोरंजनाचा विषय ठरत असला तरी अनेकांनी या घटनेला गांभिर्याने घेण्याचा सल्ला देत प्राध्यापक आणि विद्यापीूठावर कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.

दारूच्या नशेत हा प्राध्यापक शिक्षणाच्या मंदिरात कसा पोहोचला हे तुम्ही पाहिलंय का? आता तुम्हीच विचार करा, शिक्षक असा असतो तेव्हा विद्यार्थी त्याच्याकडून काय शिकणार? विद्यार्थ्याने चांगल्या शिक्षणाबरोबरच एक चांगला माणूस बनणे आवश्यक आहे, पण असे वातावरण आणि असे शिक्षक आपल्या महाविद्यालयातच पाहिल्यावर त्याचा मानसिक विकास कसा होईल, हा विचार करण्यासारखा विषय आहे. अशा काही प्राध्यापकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी