राजकीय

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार यादीतुन बीडच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव डावलण्यात आले. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा अप्रत्यक्ष इशारा पंकजा मुंडेंनी भाजपला दिला आहे (Pankaja Mude indirect warning to BJP).

मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवे, तमूक पद हवे असे मी कधीच म्हटले नाही. पद मिळवणे हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणे हे मुख्य ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथे राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपले घर सोडायचे नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या (I hope you will accept my decision, said Pankaja Munde).

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले. तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे. मला दबावतंत्रही करायचे नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसे जोडली. कुणाला सभापती बनवले तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केले. हे असेच जाऊ द्यायचे का सगळे?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. असे म्हणत त्यांनी मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आहे (In saying this, he has drawn the understanding of Munde supporters and office bearers).

मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवे, तमूक पद हवे असे मी कधीच म्हटले नाही. कधीच तशी मागणी केली नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवणे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच माझा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांच्या निधनानंतर मी संघर्ष यात्रा काढली होती, असे त्यांनी स्पष्ट केले (After my death, I went on a struggle he said).

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नामनियुक्त सदस्यांसंबंधित याचिकेबाबत राज्यपाल कोश्यारींचे दुर्लक्ष

Pankaja Munde pacifies supporters, says time not right to quit

पंकजा मुंडे

यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावे मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचे कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचे सारथ्य होते. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होते. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळाले नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

आपली शक्ती कमी करण्याचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही. मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, असे सांगतानाच योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Rasika Jadhav

Recent Posts

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

3 mins ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

2 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

3 hours ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

3 hours ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

3 hours ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

4 hours ago