राजकीय

शिवसेना भवनावर वादग्रस्त बोलणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर उदय सामंतांचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई:- शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी, सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. प्रसाद लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत पलटी मारली खरी पण त्यांच्या वक्तव्यावरुन अजूनही टीका सुरुच आहे. जनता तुम्हाला निवडणुकीत भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असे सामंत म्हणाले आहेत (Prasad Lad attacked by Uday Samant).

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत ह्यांना भुईसपाट करून देईल, असा हल्ला चढवत वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे, असे उदय सामंत म्हणाले.

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

राणेंवर या नेत्यांचा पलटवार; दौऱ्या दरम्यानच्या कृतीवर सुनावले खडेबोल

नेमका प्रकार काय घडला?

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असे चिथावणीखोर वक्तव्य केलं होते. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ज्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला (Prasad Lad said that he had distorted my statement).

उदय सामंत

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्ताने, नितेशजींच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटते की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असे प्रसाद लाड म्हणाले (Prasad Lad The strength of the Bharatiya Janata Party has definitely doubled).

प्रसाद लाड

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

BJP MLC says ‘if time comes, will demolish Shiv Sena Bhavan’, then retracts remark

स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो

प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचे म्हटले आहे. आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचे फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचे कुठलेही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असे माझ्याकडून तरी कुठलही चुकीचे वक्तव्य केले जाणार नाही.

माझे स्पष्ट म्हणने होते की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे. माझे हे स्पष्टीकरण आहे, मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत (Prasad Lad apologizes if anyone’s feelings have been hurt).

Sagar Gaikwad

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

46 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

1 hour ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

3 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago