35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयप्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

टीम लय भारी
मुंबई : शनिवारी भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पाहुणे म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे उपस्थित होते. (Prasad lad and nitesh rane to inaugurate bjp office at dadar)

यावेळी भाषण करताना त्यांनी माहीम मध्ये 5 नगरसेवक निवडून आणू अशी ग्वाही भाजप समर्थकांना दिली आहे तसेच वेळ पडलीच तर सेनाभवन सुद्धा फोडू असे जळजळीत शिवसेना विरोधी वक्तव्य केले आहे.

समुद्रकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह

दूरसंचार कंपन्यांची एसएमएस सेवा बंद

याच वेळी शिवसेनाविरोधी भाष्य करताना, किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही ते म्हणाले. शिवसेनेला ताकद देण्याचं काम आम्ही केलं आता त्यांची ताकद तोडायचं काम आम्ही करणार, असा इशाराही त्यांनी याठिकाणी जमलेल्याना दिला.

पुढच्या वेळी अशा कार्यक्रमाच्या वेळी मोजके कार्यकर्ते घेऊन येण्याचे त्यांनी सांगितले. जास्त कार्यकर्ते असतील तर पोलिसही जास्त येतात. आम्हाला इतकं भ्यायची गरज नाही असे ते म्हणाले. पोलिसांना वर्दी मध्ये न पाठवता सिव्हिल ड्रेस मध्ये पाठविल्यास त्यांनाही हॉल मध्ये बसता येईल असा त्यांचा सूर होता.

याचबरोबरीने नितेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केलेली आहे. बाळासाहेबांच्या वेळेचं सेनाभवन आता राहिलं नाही. आता त्याचं फक्त कलेक्शन सेंटर झाले आहे, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी उपस्थितांसमोर भाष्य केले.

Prasad
नितेश राणे

भारतीयांसाठी उद्याचा दिवस सुपर सँडे ठरणार; हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार

Amid widening rift between Shiv Sena & BJP, Uddhav showers praise on Gadkari

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार बोल चढवला. ‘मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

यावर प्रतिउत्तर देताना शिवसेना आमदार सदा सरवणकर म्हणाले, ‘शिवसेनेची शाखा म्हणजे आम्ही मंदिर मानतो. त्यातून लोकांची सेवा करतो. भाजपानं सुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाचं करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाहीय हे समजावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करु शकत नाही. सेनेवर आरोप करणारी व्यक्ती वैचारिक दिवाळखोरी असलेलीच म्हणता येईल. दादारमधील लोकांना समाजसेवाची गरज आहे, युद्धाची नाही. छत्रपतींच्या नावचा वापर भाजपकडूनही केला गेला आहे. महापालिकेची स्वप्न यांनी बघू नव्हेत.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी