टॉप न्यूज

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

टीम लय भारी

टोकियो:- टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारतातील सर्व खेळाडू प्रत्येक खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. भारतीय खेळाडू रोज एक नवा इतिहास रचत आहेत. भारतीय महिलांनी हॉकीच्या शनिवार (ता. 31) क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचल्या आहेत (Indian women’s hockey team has made history at the Tokyo Olympics)

कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये 2 सामने जिंकले  तर 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ग्रेट ब्रिटेन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडचा पराभव होणे आवश्यक होते.

भारतीयांसाठी उद्याचा दिवस सुपर सँडे ठरणार; हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार

टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार

पूल ए मध्ये भारतीय टीम 5 सामन्यातील 2 सामने जिंकून 6 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर होती. त्यामुळे आयर्लंड आजच्या सामन्यात जिंकली असती तर त्यांचे 6 पॉईंट्स झाले असते. पण सरासरीच्या गुणांवर त्यांनी भारताला पछाडले असते. पण ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला 2-0 ने नमवत भारताला पुढच्या फेरीत पोहोचवण्यात मदत केली.

भारतीय महिला हॉकी संघ

पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-1 असा स्कोर होता. सामन्यात चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने पहिला गोल करत भारतीय महिलांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही वेळातच आफ्रीका संघानेही गोल करत बरोबरी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील तसेच घडले. आधी भारतीय महिलांनी गोल केल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या महिलांनी पलटवार करत 2-2 असा स्कोर केला (Indian women’s team Vandana Kataria scored the first goal in the fourth minute of the match).

कियारा आडवाणी झाली 29 वर्षाची; जाणून घ्या तिच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

Olympics: Indian women’s hockey team in quarter-finals after Ireland’s defeat

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी पुन्हा एक-एक गोल केला. ज्यामुळे दोन्ही संघ 3-3 अशा स्कोरवर होते. ज्यानंतर शेवटचा आणि चौथा असा निर्णायक क्वॉर्टर सुरु झाला. ज्यात पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली आणि तिने एक अप्रतिम गोल करत भारताला 4-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर आफ्रिका संघाला एकही गोल करता न आल्याने भारतीय महिला विजयी झाल्या आहेत (Indian women’s hockey team did not score a single goal against Africa).

Sagar Gaikwad

Recent Posts

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

13 mins ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

42 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

1 hour ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago