राजकीय

‘हिंदू हृदयसम्राट’ पोस्टरवरुन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

टीम लय भारी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काल घाटकोपर येथील मनसे कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यानिमित्ताने घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. ज्यावर राज ठाकरे यांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला होता(Raj Thackeray gives instructions to activists from ‘Hindu Hriday Samrat’ poster).

राज ठाकरेंच्या नावापुढे इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करु नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. त्याचं पालन करण्याचे आदेशही दिले आहेत. राज ठाकरेंच्या नावापुढे ‘मराठी हृदयसम्राट’ हीच उपाधी लागणार, इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, राजगड मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज देण्यात आल्या आहेत.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक ‘हिंदुहृदयसम्राट’ असे म्हणतात. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेल्या एका बॅनरमुळे पुन्हा एकदा यावरुन चर्चा सुरु झाली होती. थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणणारा बॅनर लावण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत होती.

हे सुद्धा वाचा

श्रेय घेण्याचा आचरटपणा करु नये – राज ठाकरे

महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती ठरली, स्वबळावर निवडणूक लढवणार

बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली;मराठी पाट्यावरून मनसेचा टोला!

Raj Thackeray’s MNS Wants To Be ‘King, Not Kingmaker’ In Maharashtra Civic Body Elections

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

9 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

9 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

10 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

10 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

13 hours ago