राजकीय

रॅपर उमेश खाडेची सुटका करा; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

रॅपर उमेश खाडेचे ‘भोंगळी केली जनता’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. मात्र या गाण्यामुळे आता उमेश खाडे अडचणीत आला आहे. या गाण्याप्रकरणी उमेश खाडे याला वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उमेश खाडेच्या सुटकेची मागणी केली आहे.

याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर किती जणांना तुम्ही अटक करणार आहात.’, असा सवाल केला आहे. जितेंद्र आव्हाड थेट वडाळा पोलिस स्टेशनला जाब विचारला आहे. मी पोलिसांना विचारले गाणं बनवले तर अटक का केली. त्याने शिवी दिली म्हणून अटक केली. आता पोलिस स्टेशन मध्ये काय होत काय बोलतात त्याला 41/ अ ची नोटीस दिली.पोलिस आता सांगतात त्याला अटक करणार नाही. पण त्याला अटक करू शकतात.

त्याचे रॅप आले तेव्हा अंदाज होता, पोलिस अटक करणार म्हणून.मी त्या कुटुंबाच्या संपर्कात होतो.मी त्याच घर गल्ली बघितले.त्याचे घर 200 sq feet पण नाही.वडील ड्रायव्हर,आई जेवण बनवते भांडी घासते.आईने 15 हजार दिले त्यातून हे गाणे झाले.त्याच्या आई वडिलांना भेटलो.पोरगा MPSC परीक्षेची तयारी करतो. ते घाबरले आहेत. ही केस पडली तर त्याचे करियर खराब होईल, अस त्याच्या आईच म्हणणं असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.

त्याच्या वेदना मांडतो, त्याचे घर अस्वस्था मांडली !
गरीबीचे चटके जो सहन करतो. त्यातून हे काव्य येते.रँप मलबार हिल, वरळी इथून येणार नाही. हे इथून येऊ शकते. नामदेव ढसाळ कवी अश्याच वस्तीतून आले त्यांनी लिहिलेल्या कविता जगात गाजल्या. त्यांनी शिव्या दिल्या ते ऐकले असते तर सरकारने आजन्म तुरुंगात टाकले असते. गाणे बनवणारे, वाजवणारे इथेल किती कलाकार इथे आहेत. हे studio मद्ये केलं नाही. किती जणांना त्रास दिला गाणे लिहिणं, गाणारे, मिक्सिंग करणारे सगळे घाबरले आहेत, अस ही आव्हाड म्हणाले.

विद्रोह महाराष्ट्र परंपरा आहे. संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विद्रोह केला नसता तर देश नसता तयार झाला. गरीबाला घाबरवणे सोपे असते.मुंगासे नावाचा रॅपर पण गायब आहे. त्याला अटक करणार वाटले म्हणून तो गायब आहे. महाराष्ट्रात ल्या सगळ्या रँपरला सांगतो सगळ्या रॅपर ना विनंती करतो. ठाण्यात विद्रोही रॅपर कार्यक्रम घेणार सगळ्यांना एकत्र आणणार. एकट्याला सोडून चालणार नाही, अस आवाहन ही त्यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा  
शरद पवारांकडून अदानी यांची पाठराखण ही त्यांच्या पक्षाची भूमिका : नाना पटोले

बँकेला फसवणाऱ्या बँक मॅनेजरला सक्त मजुरीची शिक्षा

माध्यमांनी कंडया पिकवू नये ! अजित पवारांची नाराजी

मला बेरोजगारी आहे. नोकरी मिळत नसेल. आई डोळ्यात अश्रू असेल ह्या वेदनेतून कविता तयार झाली तर मारून टाकणार कवितेला? आमची जबाबदारी आहे आम्ही पाठीशी उभे राहू. उमेश खाडेशी मी बोललो.तू शांत रहा अभ्यास कर MPSC च तुझी कला संपवू नको. हककाचे फेलोषिप पैसे मिळत नाही. ते मिळत नाही. चाळीस दिवस ते बसून आहेत आंदोलन करत आहे. तुम्ही भेट नाही दिली. खालच्या जातींनी काय करायचे, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुधाकर काश्यप

Recent Posts

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

7 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago