30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमबँकेला फसवणाऱ्या बँक मॅनेजरला सक्त मजुरीची शिक्षा

बँकेला फसवणाऱ्या बँक मॅनेजरला सक्त मजुरीची शिक्षा

बँकेला फसवणाऱ्या मॅनेजरला 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 5 लाख दंड ठोठावला आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. इंडीयन ओवरसिस बँकेत हा गैरप्रकार झाला होता. याबाबत सीबीआयने केस दाखल केली होती. त्यानंतर हा खटला मुंबईतील विशेष कोर्टात चालला. आणि त्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपीच नाव प्रदीप शाह आहे. तो लालबाग येथे राहणारा आहे. त्याच्या सोबत ज्या कँपणीला बेकायदेशीर लोन दिल होत त्या कंपनीचे मालक ही यात आरोपी आहेत.पवई येथे एस वी कमोडिटी एक्सपोर्ट प्रा ली ही कंपनी आहे. या कंपनीला पाच कोटी लोन हवं होतं. कंपनीने इंडीयन ओवरसिस बँकेचे डिजीएम प्रदीप शाह यांच्याशी संपर्क साधला.यावेळी कंपनीची कोणतीही कागदपत्रे पूर्ण नव्हती. अर्जात अनेक त्रुटी होत्या. कागदपत्रे अपुरी होतीत. याबाबत सम्बधित अधिकार्याने आक्षेप घेत शेरा मारला होता. मात्र, यानंतर ही डिजीएम ने बेकायदेशीपणे लोन मंजूर केलं आणि त्यांना पाच कोटी रुपयांची के़डिट वलत दिली.याबाबत नंतर तक्रार झाली. सीबीआयने गुन्हा दाखल केला.ही केस मुंबई सेशन कोर्टातील सीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश एस यु वडगावकर यांच्या कोर्टात चालली. 2011 सालात हा गुन्हा घडला होता. तेव्हा पासून हा खटला सुरू होता.

हे सुद्धा वाचा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने पैसे उकळणाऱ्या विरोधात आरोपपत्र दाखल

मुंब्रा बायपास बंद; काटई, खोणी, तळोजा, कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी

गॅस दर घटणार; मोदी सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देणार

या खटल्यात के आर कमोडिटी एक्सपोर्ट प्रा लिचे मालक चंदन लुनावत आणि त्यांची पत्नी प्रतिमा लुनावत हे देखील आरोपी होते. मात्र, चंदन लुनावत यांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्यांच नाव खटल्यातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा या फरार होत्या. 2018 सालात त्यांना अटक करण्यात आली. त्याच्या विरोधातील खटला अजून सुरू आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी