31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयशरद पवारांकडून अदानी यांची पाठराखण ही त्यांच्या पक्षाची भूमिका : नाना पटोले

शरद पवारांकडून अदानी यांची पाठराखण ही त्यांच्या पक्षाची भूमिका : नाना पटोले

हिंडेनबर्ग अहवालप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समुहाची पाठराखण केली, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस त्यांच्याशी सहमत नाही, अदानींची जेपीसी चौकशी व्हावी, या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारल्यावर पटोले म्हणाले, राऊत यांचा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय ते त्यानांच माहिती आहे. आम्ही शिवाजी महाराज यांना मानणारे लोक आहोत.

अदानीने देशातील जनतेचा पैसा लुटलेला आहे. त्यामुळे त्यांची जेपीसीमार्फत चौकशी केली जावी, अशी काँगेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी यांची जेपीसी चौकशी लावण्यामध्ये अडचण काय आहे? असा सवाल पटोले यांनी केला.

हे सुद्धा वाचा
माध्यमांनी कंडया पिकवू नये ! अजित पवारांची नाराजी

बँकेला फसवणाऱ्या बँक मॅनेजरला सक्त मजुरीची शिक्षा

अजितदादा गायब, 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना ऊत

मोदी व अदानी यांचे संबंध जनतेला ठाऊक आहे, याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. शरद पवार यांनी अदानीची बाजू घेतली, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. शरद पवार स्वतः केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. त्यांना याविषयी चांगली माहिती असावी, असेही पटोले यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी