राजकीय

रोहित पवारांच्या एका फोनवर महिलेचा प्रश्न सुटला

टीम लय भारी

कोल्हापूर: कोरोना काळात अनेक लोकांचे हातचे काम गेले आहे, त्यामुळे सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता महापुरामुळे होते नव्हते ते सगळे गेले. कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे. पैसे नसल्यानं पुढचे उपचार कसे करायचे? गरिबानं कुठं जायचं? असा सवाल एका महिलेनं आमदार रोहित पवार यांना विचारला. मग रोहित पवारांनीही त्या महिलेला धीर देत रुग्णालय प्रशासनाला फोन केला आणि मोफत उपचाराची सोय करुन दिली (Rohit Pawar one Call And A woman question was Sovled).

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बुधवार (ता.4) कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यावेळी एका महिलेने भरल्या डोळ्यांनी ‘कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबाने कुठे जायचे ? अशी व्यथा मांडली. रोहित पवारांनीही लगेच संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन तिथे मोफत उपचाराची सोय करुन दिली. या संवेदनशीलतेमुळे आमदार रोहित पवार यांची कोल्हापुरात सर्वत्र चर्चा होत आहे (Rohit Pawar had arrived in Kolhapur today).

उपमुख्यमंत्र्यांसोबत केले पुणे मेट्रोचे उद्धघाटन, त्याच मेट्रो एमडीवर राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

रोहित पवार

जनता अडचणीत असल्यावर लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता जास्त गरजेची असते. आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळं पूरस्थितीनं बाधित झालेल्या एका महिलेच्या डोक्यावरील मोठं आर्थिक संकट दूर झाले आहे.

नीरज चोप्राने भाला फेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत मिळवले स्थान

Breaking News: NCP Leader Sharad Pawar to meet BJP Leader and Home Minister Amit Shah

अनेक नेतेमंडळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि आश्वासने देऊन मोकळे होतात. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्याची त्यांची इच्छाशक्ती असणे गरजेचे असते. मात्र, रोहित पवार यांनी त्या महिलेला केवळ आश्वासन न देता रुग्णालयात उपचाराचा खर्च माफ करत तिला मोठा दिलासा दिला आहे (Rohit Pawar did not just assure the woman).

Sagar Gaikwad

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

44 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

1 hour ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

3 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago