31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयउपमुख्यमंत्र्यांसोबत केले पुणे मेट्रोचे उद्धघाटन, त्याच मेट्रो एमडीवर राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्र्यांसोबत केले पुणे मेट्रोचे उद्धघाटन, त्याच मेट्रो एमडीवर राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

टीम लय भारी

नागपूर:- उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील मेट्रोचे एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यासोबत पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला होता. तर नागपुरात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी त्याच एमडी ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर मेडिकल बील घोटाळ्याचा गंभीर आरोप करत ईडी चौकशी मागणी केली आहे (Nagpur Ncp leader serious allegations against Metro MD).

नागपुरात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी बुधवार (ता.4) पत्रकार परिषद घेतली. मेट्रोच्या एमडीसह इतर संचालकांनी तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचे मेडीकल बिलाचे पैसे घेतले आहेत. कोट्यवधीचे मेडिकल बिल घेतलेल्या मेट्रोच्या संचालकांना नेमका कुठला आजार झाला आहे ? असा सवाल प्रशांत पवार यांनी केला आहे. मेट्रोच्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Breaking : पुरग्रस्तांसाठी ११,५०० कोटी, मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खोडसाळपणा, राष्ट्रवादीने फटकारले

मेट्रोच्या संचालकांनी किती रुपये मेडिकल बिल घेतले?

ब्रिजेश दिक्षीत, MD : 1 कोटी 15 लाख रुपये
महेश कुमार, WTD : 21 लाख 80 हजार रुपये
सुनील माथुर, WITD: 43 लाख रुपये
एस शिवानाथन, CFO: 21 लाख रुपये
रामनाथ सुब्रमानियम, WTI :2कोटी रुपये

Ncp leader serious allegation against Metro MD Nagpur
नागपुर मेट्रो

मेट्रोच्या संचालकांना घरी पाठवण्याची मागणी

नागपूर मेट्रोच्या एमडीवर मेडीकल बील घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एमडी ब्रिजेश दिक्षीत यांचे एका वर्षात तब्बल 64 लाखांचे मेडीकल बील झाल्याचा दावा प्रशांत पवार यांनी केला आहे. ब्रिजेश दीक्षित यांचे तीन वर्षाचे मेडिकल बील सव्वा कोटी पेक्षा जास्त झाल्याचे प्रशांत पवार यांनी म्हटले आहे. मेट्रोच्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी देखील प्रशांत पवार यांनी केली आहे (Nagpur Metro MD has been seriously accused of medical beal scam).

उद्योग मंत्री सुभाष देसाई दुर्गम भागातील संकटग्रस्तांसाठी आले धावून

Viaduct work on Nagpur Metro’s Reach-2 is 91% complete

मेट्रोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

प्रशांत पवार यांनी मेट्रोच्या एमडीसह इतर संचालकांवर मेडीकल बिलाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्याबाबतची काही कागदपत्रही त्यांनी माध्यमांना दिली आहेत. मात्र, यावर मेट्रोशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, असे प्रशांत पवार म्हणाले आहेत ( Prashant Pawar has accused metro MD and other directors of a medical bill scam).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी