राजकीय

रोहित पवारांचा पुढाकार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार अहिल्यादेवी होळकर जयंतीचा भव्य सोहळा

टीम लय भारी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी आहे. त्यांचा जन्म गाव चौंडी हे जामखेड तालुक्यात येते. या तालुक्याचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा दोन वर्षानंतर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात करण्यासाठी रोहित पवारांनी जनतेला आवाहन केले. (Rohit Pawar organizes Punyashlok Ahilya Devi Holkar Mahotsav)

यावेळी रोहित पवार म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेले. त्यांचा जन्म या मातीमध्ये झाला आणि अनेक वर्षांपूर्वीपासून त्यांचा विचार हा आपल्या आधीच्या पिढीने स्वीकारला आणि आत्मसात केला. तो आपल्यापर्यंत पोहचवला आणि आपण तो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जात आहोत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज,लोकशाहीर अण्णभाऊ साठये, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ अशा अनेक महान व्यक्ती आहेत ज्यातीलच एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच कार्य हे खूप मोठं. यांचा जन्म जामखेड तालुक्यात चोंडी या गावात झाला.

लोकप्रतिनिधी म्हणून मला या परिसराचं प्रतिनिधित्व लोकांसाठी त्याठिकाणी करायला मिळालं ही अभिमानाची गोष्ट आहे. ३१ मे रोजी त्यांची जयंती असते. अनेकवर्षांपासून त्यांची जयंती आपण उत्साहात साजरी करतो. पण गेले दोन वर्ष कोरोनामुळे ही जयंती आपल्याला साजरी करता आली नाही तर या ३१ मे रोजी आपण ही जयंती अगदी उत्साहात साजरी करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती तसंच कर्जत जामखेडचे नागरिक आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून ही जयंती साजरी करणार आहोत. ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता चोंडी याठिकाणी आपण सर्वजण मिळून ही जयंती साजरी करुया, असे आवाहन रोहित पवार यांनी जनतेला केले आहे.

अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.


हे सुद्धा वाचा :

 

रोहित पवारांचा मनसेला सल्ला “आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”

महाराष्ट्र  सरकारला OBC विरोधी म्हणणारे भाजप नेते आज मध्यप्रदेशातील भाजप सरकारलाही OBC विरोधी म्हणतील का : रोहित पवार

चिमुकल्यासाठी आमदार रोहित पवार ठरले देवदूत!

 

 

 

 

Pratiksha Pawar

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

6 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

6 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

8 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago