30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज पहाटेच ईडीने नवाब मलिकांच्या घरी जाऊन कारवाई केली. मलिकांवर झालेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे(Sharad Pawar’s big statement after the action of NCP’s Nawab Malik).

कशाची केस काढली त्यांनी? साधा कार्यकर्ता असला की दाऊदचं नाव काढायचं आणि अडकवायचं, असले प्रकार सुरू आहेत. जे लोक केंद्रांच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार यांनी केला आहे.

यात काही नवीन नाही. कुठलं तरी प्रकरण काढुन मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती. आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढुन त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

नवाब मालिकांचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टरमाईंड

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

Nawab Malik being troubled as he spoke against ‘misuse’ of central agencies: Pawar

नवाब मलिक आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमच्या मालमत्तांवर छापा टाकल्यानंतर डी गँग आणि राजकीय नेत्यांच्या कनेक्शनचा तपास सुरू असल्याची माहिती होती. या प्रकरणातच मलिकांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या चौकशी नंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी