राजकीय

भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार नाही : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका केली आहे. राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवर राजकारण तापले आहे. या सगळ्यावर भाष्य केले आहे. भाजपने त्यांचा पाचवा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अहंकार व पैशांच्या अतिरेकी बुस्टर डोसचे हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत.

सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत . राज्यसभा व नंतरच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार नाही घोडा मैदान लांब नाही !

भाजपकडे मतांचे गणित नसतानाही राज्यसभेची निवडणूक त्यांनी लादली. राज्यसभेच्या जागा सहा व उमेदवार सात. त्यामुळे निवडणूक तर होणारच. अर्थात निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपला होईल, असेच एकंदरीत वातावरण आहे. भाजपच्या प्रलोभनांना व ‘ईडी’ वगैरेच्या धमक्यांना यापुढे कोणीच बळी पडणार नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले यावर अग्रलेखात भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भाजपमधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही.

हे सुद्धा वाचा: 

राज्यसभेवर सर्व निवडून येतील त्याचप्रमाणे विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील : छगन भुजबळ

Wanted Rajya Sabha Polls Postponed Because…: Sena’s Sanjay Raut

Shweta Chande

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

3 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

3 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

3 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

3 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

3 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

7 hours ago