29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयभाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार...

भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार नाही : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका केली आहे. राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवर राजकारण तापले आहे. या सगळ्यावर भाष्य केले आहे. भाजपने त्यांचा पाचवा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अहंकार व पैशांच्या अतिरेकी बुस्टर डोसचे हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत.

सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत . राज्यसभा व नंतरच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार नाही घोडा मैदान लांब नाही !

भाजपकडे मतांचे गणित नसतानाही राज्यसभेची निवडणूक त्यांनी लादली. राज्यसभेच्या जागा सहा व उमेदवार सात. त्यामुळे निवडणूक तर होणारच. अर्थात निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपला होईल, असेच एकंदरीत वातावरण आहे. भाजपच्या प्रलोभनांना व ‘ईडी’ वगैरेच्या धमक्यांना यापुढे कोणीच बळी पडणार नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले यावर अग्रलेखात भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भाजपमधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही.

हे सुद्धा वाचा: 

राज्यसभेवर सर्व निवडून येतील त्याचप्रमाणे विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील : छगन भुजबळ

Wanted Rajya Sabha Polls Postponed Because…: Sena’s Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी