राजकीय

शरद पवारांचा कॉंग्रेसला सवाल, खरंच तुम्ही एकट्याने निवडणुका लढणार आहात का?

टीम लय भारी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांनी भेट घेतली आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. चर्चेच्या दरम्यान शरद पवारांनी असा एक प्रश्न केला की, ज्यामुळे काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांची धांदल उडाली. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?, असा थेट प्रश्न शरद पवारांनी काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांना केला (Sharad Pawar directly asked the three Congress leaders).

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांनी भेट घेतली आहे. तब्बल अर्धा तास या नेत्यांनी पवारांशी चर्चा केली. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षांतील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा प्रश्न पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी

‘2022 पासून सर्व सरकारी वाहने विजेवर चालणारी असतील’, आदित्य ठाकरे

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार

एमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा…

Sharad Pawar right candidate to take on PM Modi in 2024 elections, says Sanjay Raut

या चर्चेबाबत काय म्हणाले माणिकराव ठाकरे

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आहे. देशाचे काँग्रेसचे प्रभारी जेव्हा राज्यात येतात तेव्हा ते मित्र पक्षांच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेत असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांना भेटले. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळी इतर विषयही निघाले असतील, ते स्वाभाविक आहे.

पटोले आणि पवार साहेबांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली आहे. असे सांगतानाच युती, आघाडी करायचा निर्णय पक्ष नेतृत्व घेत असते. त्यामुळे पवार असा प्रश्न विचारतील असे वाटत नाही. आघाडीचा निर्णय हा नेहमीच अंतिम टप्प्यावर होत असतो. 2014 मध्येही अंतिम टप्प्यावर निर्णय झाला होता. त्यावेळी आम्ही वेगळे लढलो होतो. त्याआधीही तसेच झाले होते. असे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

44 mins ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

1 hour ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

1 hour ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

2 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

14 hours ago