राजकीय

अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना दिला महत्त्वाचा सल्ला!

टीम लय भारी

मुंबई :- बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मुंडे समर्थक राजीनामे घेऊन मुंबईला आले होते. काल भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगतचं होती की, या वादात आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे (Amol Mitkari gave important advice to Pankaja Munde).

पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावरून अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना ट्विट करून सल्ला दिला आहे. ट्विटमध्ये मिटकरी म्हणाले, ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असे ट्विट करत मिटकरींनी पंकजा मुंडेंना सल्ला दिला आहे (Mitkari has advised Pankaja Munde by tweeting).

तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे, पंकजा मुडेंचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

पंकजा मुंडे घेणार नाराज समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची भेट

अमोल मटकरींनी या ट्विटमधून भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्लाही चढवला आहे. मिटकरी यांच्या या सल्ला वजा खोचक ट्विटची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मात्र, अमोल मिटकरींच्या या सल्ल्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे आणि अमोल मिटकरी

मुंडे भगिनी पक्षावर नाराज असलेल्या चर्चेला पंकजाताई मुंडे यांनी पूर्णविराम लावला

Explained: How the Pankaja Munde camp unrest could impact BJP, Maharashtra politics

पंकजा मुंडेंनी समर्थकांशी साधला संवाद

नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा यांनी काल या समर्थकांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.

पण, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही, मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या (I am on your soul, said Pankaja Munde).

पंकजा मुंडेंनी काढली समर्थकांची समजूत

धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावे मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचे कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचे सारथ्य होते. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होते. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळाले नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. असे म्हणत त्यांनी सर्व मुंडे समर्थक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

4 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

6 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

8 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago