राजकीय

कुटुंबातील लढाईवर शरद पवारांच्या बहिणीचं मोठं वक्तव्य; कोणाची घेतली बाजू?

राज्याचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha election 2024) मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार (Pawar vs Pawar) अशी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. अजित पवारांच्या या बालेकिल्ल्यात कुटुंबातून उभा राहणारा उमेदवार सहज निवडून यायचा. पण याचं कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या मुळं राजकीय लढतीसोबत कुटुंबातील लढत पाहायला मिळणार आहे. अशातच शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या वादात पवार कुटुंबात अजित पवार एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासर्व परिस्थितीवर शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.( Sharad Pawar Sister Saroj Patil reaction on Pawar vs Pawar )

पवार विरुद्ध पवार या सुरु असलेल्या लढतीवर सरोज पाटील यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. निवडणुकीपर्यंत हे ढग आहेत, निवडणूक संपली की हे ढग निघून जातील, असं वक्तव्य सरोज पाटील यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सरोज पाटील?

गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. निवडणुकीनंतर जे निवडून येतील ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून आता येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन्ही अत्यंत डावे-उजवे लोक होते. पण कधीही राजकारण घरात आणलं नाही. एनडी पाटील राजाराम बापूंविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले, तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यावेळी माझ्या आईने प्रचारासाठी त्यांना 10 हजार रुपये दिले होते. राजकारण घरात आणलं नाही. आम्ही एकाच ताटात जेवतो. असं वक्तव्य सरोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

रात्रीस खेळ चाले…राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट

तसेच, अजित पवार किंवा श्रीनिवास पवार काय बोलला हे निवडणूक संपले की संपेल. हे ढग निघून जातील. लोकांनी कोणाच्या बाजूने उभे राहवे, हे लोकांनी ठरवावे, असे सरोज पाटील यावेळी म्हणाल्या.

भाजपचा रोख सर्व शरद पवार यांच्यावर आहे. शरद पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. त्या जोरावर ते काहीही करु शकतात. अजित यांचा तोल थोडा सुटला असणार…पण त्यालाही दु:ख झाले असले. अजित चुकाला आहे की नाही, मला कळत नाही. परंतु शरद संदर्भात त्यांच्या तोंडातून जी भाषा आली, ते बोलण्याच्या ओघात आली असले. त्यांच्या मनात तसे काहीच नसेल. त्याला लहानपणापासून मी ओळखतो. तो संवेदनशील आहे. त्याला पश्चताप अन् दु:खही झाले असेल.

राज ठाकरेंनी स्वत:चा एकनाथ शिंदे, अजित पवार होऊ देवू नये

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात कोण विजयी होणार? यावरही सरोज पाटील यांनी भाष्य केलं. माझे दोघींवर प्रचंड प्रेम आहे. सुनेत्रा गोड आहे. सुप्रियाचे मला आश्चर्य वाटते. ती सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आली. तिला आम्ही फुलासारखे वागवले. ती इंग्रजी माध्यमात शिकली. त्यानंतर तिने स्वत:मध्ये प्रचंड बदल केला. तिच्या लोकसभेतील भाषणाला विरोधकही दादा देतात. आता ती मराठी उत्तम बोलते, हिंदी चांगली बोलते. परंतु या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही, हे निश्चित आहे.

धनश्री ओतारी

Recent Posts

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

16 mins ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

31 mins ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

60 mins ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

1 hour ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

13 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

13 hours ago