31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्ररात्रीस खेळ चाले...राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट

रात्रीस खेळ चाले…राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का? हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भाजप(BJP) नेत्यांसोबतच्या त्यांच्या बैठका सध्या चर्चेत येत आहेत. अशातच मध्यरात्री राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस ((Devendra Fadnavis) यांच्यात अज्ञातस्थळी भेट झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये ३० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. 'भेटी होतच असतात', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला आहे. (Devendra Fadnavis Raj Thackeray Midnight Meet Loksabha election 2024)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का? हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भाजप(BJP) नेत्यांसोबतच्या त्यांच्या बैठका सध्या चर्चेत येत आहेत. अशातच मध्यरात्री राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस ((Devendra Fadnavis) यांच्यात अज्ञातस्थळी भेट झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये ३० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. ‘भेटी होतच असतात’, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला आहे. (Devendra Fadnavis Raj Thackeray Midnight Meet Loksabha election 2024)

दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात बोलताना सूचक वक्तव्य केलं होतं.

राज ठाकरेंनी स्वत:चा एकनाथ शिंदे, अजित पवार होऊ देवू नये

अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. या गोष्टी अतिशय प्राथमिक पातळीवर आहेत. यावर आता काही बोलण्यापेक्षा एक ते दोन दिवस वाट पाहावी. म्हणजे सगळ्या गोष्टी नीट आणि सविस्तर पद्धतीने सांगू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान दोघांची मध्यरात्री मुंबईत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार – शरद पवार गटात बिनसले, बारामतीत वादंग

देवेंद्र फडणवीस रात्री ११ वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. तर, त्याच वेळेत राज ठाकरे हे शिवतीर्थ बंगल्यातून बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं असून दोन्ही नेत्यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११.३० ते १२.१५ वाजेच्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. फडणवीसांच्या भेटीनंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर आले. मध्यरात्री झालेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटलांचे मोठं वक्तव्य

या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे आणि तुमची उशिरा भेट झाली? असा प्रश्न विचारला असता, “उशिरा झाली की, लवकर झाली. तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता. भेटी होतच असतात.” असं उत्तर फडणवीसांनी यावेळी दिलं.

राज्यातील ४८ जागांसाठी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय कंबर कसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी लवकरच अधिसूचना जारी होत असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून मनसे महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी