33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंनी स्वत:चा एकनाथ शिंदे, अजित पवार होऊ देवू नये

राज ठाकरेंनी स्वत:चा एकनाथ शिंदे, अजित पवार होऊ देवू नये

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या दौऱ्यामुळं मनसे  राज्यातल्या सत्ताधारी भाजप-शिवसेना(BJP Shivsena) (शिंदे गट) नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. तर राज ठाकरेंच्या चाहत्यांच्या मनात वेगळीच भिती निर्माण झाली आहे. राज ठाकरेंनी स्वतःचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) होऊ देवू नये अशी प्रार्थना चाहते करताना दिसत आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या दौऱ्यामुळं मनसे  राज्यातल्या सत्ताधारी भाजप-शिवसेना(BJP Shivsena) (शिंदे गट) नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. तर राज ठाकरेंच्या चाहत्यांच्या मनात वेगळीच भिती निर्माण झाली आहे. राज ठाकरेंनी स्वतःचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) होऊ देवू नये अशी प्रार्थना चाहते करताना दिसत आहे.

आधी एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार आणि आता राज ठाकरे भाजपच्या या खेळीचे चित्र राजकीय वर्तुळात स्पष्ट होत दिसत आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी महाराष्ट्र हे राज्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. कोणतीही जोखीम नको म्हणून दोन पक्षाच्या नेत्यांना फोडून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. पण त्यातही मराठी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे या आडनावाची गरज असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटत आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

2024 ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष्य आहे. त्यासाठी भाजपकडून सध्या राज्यात चाचपणी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या भाजपला कोणतीही रिस्क नको आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली. पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारासाठी भाजपला शिवसेनेची गरज भासतीय. पण उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडलीय. याची खंत कुठेतरी भाजपला वाटतीय.

राज्यात २०१९ मध्ये आणि नंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ‘बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सोडून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात धरला अशी आरोळी ठोकायला भाजपनं सुरुवात केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं. शिंदेंचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदेंना ठाण्यापलिकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून येत आहे.

अशातच अजित पवारांना सोबत घेत भाजपनं राज्यात महायुती स्थापन केली. पण त्याचा फायदा फारसा झाला नाही. अजित पवारांना सोबत घेऊन, शरद पवारांचा पक्ष फोडून देखील भाजपाला मविआवर वरचढ ठरणे कठीण जाणार असल्याचे एका सर्वेक्षणातून लक्षात आले आहे.

त्यामुळं राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. ज्या गोष्टी भाजपला या निवडणूकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईत मराठी मतदार, ठाकरे कुटुंबातील सदस्य, उद्धव ठाकरेंविरूध्द भूमिका यासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज भासतेय.

राज ठाकरे यांना लोकं मते देत नाहीत, पण राज ठाकरे सभा गाजवतात हे मोदी व शाह यांनी हेरलंय. सध्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी कुटुंबामध्ये फुट पाडत भाजपची साथ दिल्याने राज्याती नागरिक त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे हे दोघे ते सभा गाजवू शकत नाहीत असं भाजपच्या लक्षात आलं आहे.

पण राज ठाकरे यांनी स्वतःचा एकनाथ शिंदे व अजित पवार होवू नये याची मात्र काळजी घ्यायला हवी. नाहीतर मराठी स्वाभिमान गुजरात्यांच्या चरणी वाहिला म्हणून लोक राज ठाकरेंनादेखील शिव्याशाप द्यायला सुरूवात करतील. लोकांशी विश्वासघात केला तर काय होते, हे राज ठाकरे यांनी गेल्या १० – १५ वर्षात चांगलेच अनुभवलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी