Categories: राजकीय

मोदी सरकार एका हाताने देते पण चार हाताने गरिबांचे ओरबाडून घेते : श्रीरंग बरगे

टीम लय भारी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे दोघेही गुजरात मधील आहेत. गुजरात विशेषतः व्यापारासाठी ओळखले जाते. त्यांचा दृष्टीकोन व्यावसायिक असून दोघांना देखील जनतेच्या प्रश्नांशी घेणे देणे नाही. जाहिरात बाजी आणि प्रत्यक्ष अमल करण्यात मोठी तफावत आहे. त्यांच्या योजना फसव्या आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सेक्रेटरी श्रीरंग बरगे यांनी केला आहे (Shrirang Barge, newly appointed Secretary, Maharashtra Pradesh Congress Committee).

श्रीरंग बरगे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी सांगितले की, मोदी सरकार एका हाताने देत आहे पण चार हाताने गरिबांचे ओरबाडून घेत आहे.गॅस, डीझल व पेट्रोल दरवाढ केली. कोट्यवधी रुपयांचा कर मिळविला. पण अनेक फसव्या घोषणा करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.  ह्या योजनाने प्रत्यक्षात मात्र जनतेची लूट सुरू असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या २००० रुपये खात्यात जमा केले तरी शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. याचाच अर्थ  जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शेतीला लागणाऱ्या खत व बी बियाणे यांच्याही किमती गगनाला भिडल्या आहेत. एकीकडे उद्योजकांना हजारो कोटीचे कर्ज माफ केले जात आहे पण गरीब शेतकऱ्याला दहा वीस हजारसाठी आत्महत्या करावी लागत आहे. हे दुर्दैवी आहे (Shrirang Barge is currently on a tour of Kolhapur).

Mumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग
धनंजय मुंडेंनी बार्टीला दिला घसघशीत निधी
कोल्हापूर दौऱ्या दरम्यान बरगे यांनी मोदी सरकारवर जनतेसमोर फसव्या घोषणा केल्याचे आरोप केले

मोदींनी सत्तेत येताना ना खाऊगा ना खाणे दूगा म्हटले होते, विकास करू म्हणाले. रेल्वे, एल आय सी, विमानतळ या सारख्या राष्ट्रीय संपत्तीचे मूल्यांकन करून त्या गुजरात मधील उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट घातला आहे. नोटा बंदी, जीएसटी, सारखे निर्णय घेऊन जनतेला त्रास दिला.

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून पुनरुच्चार

Government should completely take over MSRTC : Workers’ union petition CM Uddhav Thackeray

काँग्रेसने काही केले नाही असेही म्हणाले पण आज ७० वर्षात काँग्रेसने अनेक उद्योग उभे केले. त्यावर  कित्येक कुटुंब अवलंबून होते. त्या कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. लॉकडाऊन मध्ये हजारो छोटे  व्यापारी व दुकानदार यांना काहीही मदत केली नाही. कोट्यवधी कामगाराची रोजी रोटी बंद झाली त्यांनाही फारशी मदत केलेली नाही. अशा या केंद्र सरकारला जनतेने धडा शिकवला पाहिजे. असे मत या वेळी बरगे यांनी व्यक्त केले (Shriran Barge was expressed This opinion by this time).

लॉकडाऊन मध्ये हजारो छोटे  व्यापारी व दुकानदार यांना काहीही मदत केली नाही. कोट्यवधी कामगाराची रोजी रोटी बंद झाली त्यांनाही फारशी मदत केलेली नाही. अशा या केंद्र सरकारला जनतेने धडा शिकवला पाहिजे. असे मत या वेळी बरगे यांनी व्यक्त केले.

वैष्णवी वाडेकर

Share
Published by
वैष्णवी वाडेकर

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

10 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

11 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago