34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeएज्युकेशनधनंजय मुंडेंनी बार्टीला दिला घसघशीत निधी

धनंजय मुंडेंनी बार्टीला दिला घसघशीत निधी

टीम लय भारी

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला सोमवार (13 सप्टेंबर) रोजी  91.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे (Dhananjay Munde immediately distributed Rs 91.50 crore to Barti)

तुमच्यामुळे अनेक मुलांचे स्वप्न पूर्ण होत आहेत ; ‘या’ तरूणाने मानले धनंजय मुंडेंचे आभार

सफाईगाराची मुलगी, धुणी भांडी करणाऱ्या महिलेचा मुलगा जाणार परदेशी शिक्षणासाठी, धनंजय मुंडेंच्या निर्णयाचा फायदा

काही प्रसार माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे.

बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण 91.50 कोटी रुपये स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले.

Dhananjay Munde immediately distributed scholarship to Barti
बार्टीच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मिळवला सिंधुताई सपकाळांच्या संस्थेला अनुदान देण्याचा पहिला मान

Dr. Babasaheb Ambedkar Scholarship To Benefit More Students

दरम्यान यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, उलट सर्व योजना अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत, असा निर्वाळा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान बार्टीला कोविडच्या आर्थिक संकटात देखील तातडीने 91.50 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत (Dhananjay Munde called on Chief Minister Hon. Uddhavji Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar).

महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90 % पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याबाबतची योजना बार्टी मार्फत सुरू केली आहे.  या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही योजनेच्या निधीला धक्का लागणार नाही व कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे (Dhananjay Munde is confident that the funds of any scheme will not be affected and there will be no shortage of funds anywhere).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी