टॉप न्यूज

चक दे इंडिया! 41 वर्षांनंतर पुरुष हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय

टीम लय भारी

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक मधील आजच्या दिवसाची सकाळ ही सर्व भारतीयांच्या लक्षात राहण्या जोगी ठरली आहे. कारण, भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिंपिक कांस्य पदकावर जर्मनी विरूद्ध आपले ऐतिहासीक नाव गोंदले आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने हॉकी पदकाला गवसणी घातली आहे (After 41 years, India has won the hockey medal).

कसा रंगला सामना?

कांस्य पदकाच्या या लढतीत भारत विरुद्ध जर्मनी असा सामना होता. भारताने जर्मनीचा 5-4 असा दारुण पराभव केला आहे. 25 व्या मिनिटाला 3-1 पिछाडीवर असताना, भारताने जोरदार कमबॅक करून, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2 गोल करून भारताने जर्मनीला पिछाडीवर ढकलले आणि जर्मनीचा 5-4 असा दमदार पराभव करून, कांस्य पदकावर भारताचे ऐतिहासिक नाव कोरले.

भारतीय हॉकी संघ खेळताना

भारतीय पुरूष हॉकी संघाचा बेल्जिमकडून उपांत्य फेरीत पराभव

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

1980 मध्ये 1 गोलच्या फरकाने भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता तब्बल 41 वर्षानंतर पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर विजय नोंदवला आहे

टोकियो ऑलिम्पिक हॉकी पुरुष संघात उत्कृष्ठ कामगिरी करून इतिहास रचलेला संघ

  • मनप्रीत सिंग- कर्णधार
  • पी. आर. श्रिजेश
  • हर्मनप्रीत सिंग
  • रुपिंदर पाल
  • सुरेंद्र कुमार
  • अमित रोहिदास
  • बिरेंद्र लकरा
  • हार्दिक सिंग
  • विवेक सागर
  • नीलकंठ शर्मा
  • सुमित वाल्मिकी
  • शमशेर सिंग
  • दीलप्रीत सिंग
  • गुरुजंत सिंग
  • ललित कुमार उपाध्यय
  • मनदीप सिंग
भारतीय हॉकी संघ खेळताना

या सर्वांच्या कामगिरीचे संपूर्ण भारतभर कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनी तर, ‘ऐतिहासिक’ अशा शब्दात भारताच्या हॉकी संघाच्या विजयाचे वर्णन केले आहे. प्रत्येक  भारतीयांच्या मनात तुमचा हा विजय कोरला जाईल. मायदेशी कांस्य पदक घेऊन परतणाऱ्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे. अशा शब्दात कौतुक केले आहे (Such words are appreciated).

मुंबईला पुरापासून वाचविण्याची गरज, शिवसेना आमदाराने सुचविला भन्नाट उपाय

In 5 Pics: Indian Men’s Hockey And Pure Joy At Olympics

‘पुरुष हॉकी संघाने आपले कौशल्य, लवचिकता, आणि विजयचा दृढनिश्चय दाखवला आहे. हा ऐतिहासिक विजय भारताला हॉकीच्या नव्या युगाची सुरुवात करेल. युवकांना यातून प्रेरणा मिळेल.’ अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कौतुक केले आहे.


 

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago