35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजभारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक...

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

टीम लय भारी

टोकियो:- जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. पी.व्ही. सिंधूने रविवार (ता.1) कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये पोहचून नवा इतिहास रचला आहे. या विजयानंतर सर्व देश भारतीय हॉकी संघाची वाह वाह करत असून हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा हे देखील भावूक झाले आहेत. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देखील दिल्या (Indian men’s hockey team won semifinal Former captain Viren Raskinha has emotional).

यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघांने अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळच्या ऑलम्पिकमध्ये हॉकी खेळात 6 संघ असल्याने राऊंड रॉबिन नंतर पहिल्या दोन संघात फायनल झाली होती. मॉस्को इथे झालेल्या 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर भारताला हॉकीमध्ये एकही पदक जिंकता आले नसल्याने यंदाची ऑलिम्पिक भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे. हॉकीमध्ये भारताकडे आठ सुवर्णपदकं आहेत (Indian men’s hockey team won the last gold medal in 1980).

सिंधूने भारताला मिळवून दिले कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

डोळ्यात आनंदाचे अश्रू

वीरेन रसकिन्हा यांनी हॉकी संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर लिहिलं, मॉस्को ओलिम्पिक वेळी 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघासाठी आजचा क्षण सर्वात मोठा आहे. मला संपूर्ण संघावर गर्व आहे. माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आहेत. तुम्ही टोकियोमध्ये करत असलेल्या कामगिरी बद्दल तुमचे धन्यवाद.

यानंतर केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये वीरेन रसकिन्हा लिहीतात, ओलिम्पिक क्वॉर्टर फायनल जिंकण्यासाठी भूख, आग आणि इच्छा आवश्यक होती. पुरुष हॉकी संघाने ते सर्व दाखवले. आता बेल्जियम विरुद्धच्या सामन्यासाठीही तयार व्हा! संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत असून तुमचाच जयकार करणार आहे.

Indian men's hockey team won Former captain emotional
माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा

महाराष्ट्र हळहळला, 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा आज पहाटे मृत्यू

Past masters India eye Olympic semifinal berth in men’s hockey after 41 years

पहिल्या हाफमध्ये 2-0 ची आघाडी

पहिल्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ दाखवला. टीम इंडियाने दोन्ही क्वॉर्टरमध्ये एक-एक गोल केला. आधी 7 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 16 व्या मिनिटाला गुरजंत सिंगने आणखी एक गोल करत 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरच्या अंती भारत 2-0 च्या आघाडीवर होता.

Indian men's hockey team won Former captain emotional
भारतीय पुरुष हॉकी संघ विजयी

ब्रिटेनचे पुनरागमन, पण भारतच विजयी

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी चुरशीची टक्कर दिली. ब्रिटन संघाकडून आक्रमण झाली पण भारतीय डिफेन्सने तगडा खेळ दाखवला. ब्रिटेनने 3 पेनल्टी कॉर्नर घेतले ज्यात एक प्रयत्न यशस्वी झाल्याने त्यांनी 2-1 ने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र भारताने एकही संधी दिली नाही. उलट 57 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने एक गोल करत भारताला 3-1 ची विजयी आघाडी मिळवून दिली. या विजयासह 1980 नंतर प्रथमच भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे (Indian men’ hockey team has reached the semifinals for the first time since 1980 with a victory).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी