टॉप न्यूज

कोलकात्याला ‘आनंदी शहर’ (सिटी ऑफ जॉय) असे का म्हणतात, जाणून घ्या

प्राची ओले: टीम लय भारी

पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता(calcutta) ची स्थापना जॉब चार्नोक याने 24 ऑगस्ट 1690 मध्ये कोलकत्ता शहराची स्थापना केली. यंदाच्या वर्षी कोलकाता शहराचा 311वा वर्धापन दिन आहे. कोलकाता हे शहर भारताचे दुसऱ्या स्थानावरचे महानगर आहे. गंगेची उपनदी असलेल्या हुगळी नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. 1772 पासून 1912 पर्यंत ब्रिटीश भारताची राजधानी कोलकाता होती(Calcutta was founded on 24 August 1690).

या शहराला सिटी ऑफ जॉय (आनंदी शहर) असे का म्हणतात, जाणून घ्या

कोरोना हृदय सम्राट गप्प का, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

राणेंच्या नावावर मेंटल हॉस्पिटलमध्ये युवा सैनिकांनी काढला केस पेपर

संस्कृती, प्रेम, रहस्य, आदर, उत्साह आणि काही गोड पदार्थांसाठी या शहराचे ‘आनंद शहर’ असे नाव पडले. जुने जग आणि नवीन आधुनिकता यांच्यातील एक परिपूर्ण मध्यबिंदू जुळवून देणारे कोलकाता हे शहर आहे.

कोलकात्याला ‘आनंदी शहर’

या शहरात प्रत्येक गल्लीसह, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक गोष्ट सांगण्यासारखी आहे.
कोलकाता हे 1772 ते 1912 पर्यंत ब्रिटिश भारताची राजधानी होती. ब्रिटिश साम्राज्यासाठी हे महत्वाचे शहर होते. त्यामुळे या शहरात बऱ्याच ब्रिटिश वास्तुकला आढळतात.

येथील सार्वजनिक वाहतूक ही शहराची जीवनरेखा आहे. कोलकत्ताची ट्राम हे ह्या शहराचे वैशिष्ट्य आहे. कोलकाता हे संपूर्ण जगातील काही शहरांपैकी एक आहे ज्या शहरात ट्राम हे वाहतुकीचे साधन आहे.

कोलकाता मध्ये भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे जगातील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सेकंड हँड बुक मार्केट हे देखील याच शहरात आहे. असे मानले जाते की, कॉलेज स्ट्रीट येथे जर तुम्हाला पाहिजे ते पुस्तक सापडले नाही तर कदाचित ते पुस्तकच अस्तित्वात नसेल.

कोलकात्यातील कालीमातेची दुर्गा पूजा ही जगप्रसिद्ध आहे. पारंपारिक सण येथे अगदी उत्साहात साजरे केले जातात. स्त्री रुपाला कालीमातेचं रूप मानणे ही कोलकात्याची संस्कृती आहे.

क्रीडांच्या बाबतीत देखील हे शहर मागे रहात नाही. फुटबॉल साठी प्रसिद्ध असलेल्या शहरांपैकी हे एक शहर आहे. भव्य स्टेडियम आहेत. फुटबॉल आणि क्रिकेट यांसाठी वेगळे वेगळे स्टेडियम आहेत. जे प्रत्येक क्रीडाप्रेमीचे स्वप्न पूर्ण करते.

‘वडील मजुरी करतात, अमेरिकेतील शिक्षणाचा विचारही केला नव्हता’

Family from Baranagar moves Calcutta High Court with plea for rape probe

खाद्यप्रेमींसाठी हे शहर एक उत्तम ठिकाण आहे. मासे आणि भात हे ह्या ठिकाणचे मुख्य व्यंजन आहे. माचेर झोल हा एक सुप्रसिद्ध मासे साराचा प्रकार आहे. कोशा मंगोशा हा मटणाचा प्रकार आहे. त्याचबरोबर शुक्त, कोलकात्याची बिर्याणी, चेलो कबाब, मोचार घोंटू हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. कोची पठार झोल, इलिश, पिठे, पायेश खऱ्या खवय्यांची चव-कळ्या तृप्त करताना चार्टमध्ये सर्वात वर आहे. स्ट्रीट फूडबद्दल बोलताना, आनंदाचे कोलकाता शहर तुम्हाला फुच्का, चुरमुर, भेलपुरी, कचुरी, जलेबीच्या उच्च डोससह तेजस्वी स्मित देईल, तर गरम, दार्जिलिंगस्क्यू मोमो स्वतःला स्ट्रीट फूडच्या यादीत विशेषाधिकार प्राप्त सदस्य म्हणून मोजत आहे.

कोलकाता हे मिठाईसाठी जगप्रसिद्ध शहर आहे. कोलकात्याचा रसगुल्ला हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. असे मानले जाते जेवढी येथील मिठाई गोड आहे, तेवढीच येथील माणसांची भाषा आणि माणसं देखील गोड आहेत.

कोलकाता हे एक असे शहर आहे, ज्यात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. मग तुम्ही अन्नप्रेमी असाल, पुस्तकी कीडा असाल, इतिहासाचे वेडे असाल, किंवा एक भटकंती करणारे असाल. म्हणून या शहराला आनंदाचे शहर असे म्हणतात.

 

Mruga Vartak

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago