34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराणेंच्या नावावर मेंटल हॉस्पिटलमध्ये युवा सैनिकांनी काढला केस पेपर

राणेंच्या नावावर मेंटल हॉस्पिटलमध्ये युवा सैनिकांनी काढला केस पेपर

टीम लय भारी

ठाणे: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर युवा सैनिकांनी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये राणेंच्या नावावर केस पेपर काढला आहे (Narayan Rane made an offensive statement against the Chief Minister).

शिवसैनिकांच्या युवा सैनिकांनी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर हातात कोंबड्या घेऊन आंदोलन केले. तसेच राणेंच्या नावावर मेंटल हॉस्पिटलमध्ये केस पेपर देखील काढण्यात आला आहे. त्याचबरोबर उपचारासाठी लागणारा सर्व खर्च शिवसेना उचलेल असा टोलाही युवा सैनिकांनी लगावला.

नारायण राणे ‘कोंबडी चोर’ शिवसेनेची पोस्टरबाजी

‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’

Narayan Rane made an offensive statement against the Chief Minister
युवा सैनिकांनी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये राणेंच्या नावावर काढला केस पेपर

 काय आहे हे प्रकरण 

नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी ते कोकणचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला होता. एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नाक कापणे, गोळ्या झाडणे, दगडाने ठेचणे… वाचा तालिबान्यांची क्रूर कहाणी

Minister Narayan Rane Faces Arrest Over ‘Slap Uddhav’ Jab; BJP-Sena Clash

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता.

शिवसैनिकांनी लावले ‘ कोंबडी चोर ‘ चे बॅनर 

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणेंचा मोठा बॅनर लावत त्यावर ‘कोंबडी चोर’ लिहिले आहे.

Narayan Rane made an offensive statement against the Chief Minister
शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी लावले बॅनर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी