टॉप न्यूज

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसची स्वच्छता मोहीम

टीम लय भारी

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांचा हात आहे. परंतु महात्मा गांधींचा त्यात मोठा वाटा आहे. त्यांचे भारतासाठीचे हे योगदान पाहून त्यांना आपण राष्ट्रपिता ही पदवी बहाल केली. ते अत्यंत स्वच्छताप्रिय होते. त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने भारतात अनेकठिकाणी स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या. (Congress cleansing campaign on the occasion of the birth anniversary of Father of the Nation Mahatma Gandhi)

मुंबईतील परळ व्हिलेज येथेही मुंबई काँग्रेस च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचाच एक हिस्सा शिवडी तालुका काँग्रेस ब्लॉक क्रमांक २०५ येथील कार्यकर्ते परळ व्हिलेज येथे कार्यरत होते. यावेळी इतर सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सचिव श्रीरंग बरगे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांचे वन्य प्रकल्पांसाठी एक पाऊल पुढे

पीएमआरडीच्या आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा, अँड आशिष शेलार यांचा आरोप

देशातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे महात्मा गांधी यांचे मत होते. आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारांतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजींच्या विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारातून केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक महान संदेश दिले आहे. काँग्रेस च्या वतीने राबवित असलेला कार्यक्रम स्तुत्य असून गांधी विचाराना अभिप्रेत या कार्यक्रमाचे आयोजन करणारे कार्यकर्ते खरे खुरे गांधी अनुयायी आहेत, असे श्रीरंग बर्गे यावेळी म्हणाले.

श्रीरंग बरगे पुढे म्हणाले की, देशातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे महात्मा गांधी यांचे मत होते. आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारांतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजींच्या विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारातून केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक महान संदेश दिले गेले. असे असले तरी त्यांचे विचार, आंदोलन याचे आकलन करताना आपण त्यांच्या दिनचर्येतून मिळालेली शिकवण विसरतो. महात्मा गांधीजींची संपूर्ण दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती.

परमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

How Congress is slipping into a dark, black hole Read more at: 

त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या सर्व महिला आणि पुरुष हे स्वच्छतेवर भर देणारे होते. स्वत:च्या हाताने घराची आणि परिसराची साफसफाई करणे ही गोष्ट केवळ गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांची जीवनशैलीचा भाग नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच स्वच्छतेवर आधारलेले होते. गांधीजींनंतर त्यांच्या आश्रमात आणि विद्यालयात साफसफाईवर भर राहिला, त्याचे अनुकरण म्हणून मुंबई शहरात स्वच्छता मोहीम काँग्रस राबवित असल्याची माहिती बरगे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई काँग्रेसचे सचिव व ब्लॉक क्रमांक २०५चे अध्यक्ष गोरख कांगणे यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमात दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस कैलाश जाविर, अशोक गराटे, रमेश साळवी, प्रशांत खानोलकर, विजय मांडवकर, सुरेशगावडे आदी पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Mruga Vartak

Recent Posts

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

52 mins ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 hour ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 hour ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

3 hours ago

नवरात्रीच्या उपवासात शेंगदाणे खाण्याचे फायदे, जाणून घ्या

3 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात नवरात्रीचा सण सुरू होत आहे, आणि हा सण 11 ऑक्टोबर…

4 hours ago

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

5 hours ago