32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजपरमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

परमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपने मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. (BJP helps Parambir Singh to flee India) 

जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपाची निश्चित भूमिका असणार आहे. असे वक्तव्य सचिन सावंत यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती

परमबीरसिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपची मदत, काँग्रेसचा आरोप

अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुकेश अंबानींच्या अँटिलीया निवासस्थान येथे झालेल्या घटनेचा तपास चालू केला होता. या चौकशीच्या आरोपपत्रात वाझे परमबीरना रिपोर्ट करत होते व परमबीर यांनी जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ञाला पाच लाख रुपये दिले. असे सावंत यांनी म्हंटले आहे.

परमबीरसिंग पळून गेले तर ते NIA चे अपयश आहे, असे म्हणत चौकीदार सरकार काय करत होते? असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केला आहे.

नीरव मोदी, चोक्सी, विजय मल्ल्या आणि परमबीर सारखे लोक जेव्हा देश सोडून पळून जातात तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? असा तिखट प्रश्न सचिन सावंतांनी आपल्या ट्विटर हॅन्डलरवरून विचारला.

सरकारचे हे झोपेचे सोंग एक न एक दिवस उघड झाल्याशिवाय राहणार नाही अशा विश्वासही सावंतांनी यावेळी व्यक्त केला.

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

Amarinder Singh To NDTV: “Not Joining BJP, But Won’t Remain In Congress”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी