31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठाकरे यांचे वन्य प्रकल्पांसाठी एक पाऊल पुढे

उद्धव ठाकरे यांचे वन्य प्रकल्पांसाठी एक पाऊल पुढे

टीम लय भारी

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहात 2021 च्या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ झाला. हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. (Wildlife Week 2021 started at Sahyadri Guest House. The ceremony was officiated by Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray)

या कार्यक्रमास पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

पीएमआरडीच्या आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा, अँड आशिष शेलार यांचा आरोप

विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती

या शूभ दिनाचे औचित्य साधून पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. तसेच महाराष्ट्रातील अभयारण्ये  आणि संवर्धन राखीव क्षेत्राची माहिती देणाऱ्या  “वाईल्ड महाराष्ट्र” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर या वेळी महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरणही करण्यात आले.

या सादरीकरणातील काही महत्वाची वैशिष्ट्ये

  • राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20 टक्के वनक्षेत्र.भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2017 व 2019 नुसार अनुक्रमे 82 चौ.किमी व  16 चौ किमी ने वाढले.
  • पांढरी चिप्पी राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
  • राज्यात 50 अभयारण्ये, 15 संवर्धन राखीव. भविष्यात 10 संवर्धन राखीव घोषित करण्याचे नियोजन
  • समृद्धी महमार्गावर वन्यजीवासाठी 1797  ओलांड मार्ग.
  • राज्यात नांदूर मध्यमेश्वर आणि लोणार या 2 रामसर साईट.
  • 5 ते 12 नोव्हेंबर या काळात पक्षी संवर्धन सप्ताहाचे राज्यात आयोजन.

या समारोहास मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  प्रधानसचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी,  प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री सुनील लिमये, जी साईप्रकाश यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्य जीव प्रेमी उपस्थित होते. तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

सदाभाऊ खोतांच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागण्या

उद्धव ठाकरे यांचे वन्य प्रकल्पांसाठी एक पाऊल पुढे

Tamil Nadu Forest Department conducts competitions for Wildlife Week

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी