टॉप न्यूज

जयंत पाटील यांचे करेक्ट गाणे.. ‘रात कली एक ख्वाब में आई’…!

टीम लय भारी : अतुल माने, वरिष्ठ पत्रकार

मुंबई : राजकारणात आणि समाजकारण यामध्ये असणाऱ्या व्यक्तिना स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासणे तसे कठीण असते. त्यातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सारखा सातत्याने कार्यमग्न असणारा संवेदनशील नेता असला तर ते खूपच अवघड असते. स्वतःला एखाद्या प्रसंगात अथवा प्रसंगात गुंतवून त्याचा मनसोक्त आणि मनस्वी आनंद घेणे खरे तर जयंत पाटील यांना विरळच. पण तो प्रसंग आज आला आणि चक्क जयंत पाटील (Jayant Patil) हे गायकीत गुंग होऊन गेले. इतके गुंग झाले की त्यांना रात कली एक ख्वाब मे आयी.. या गाण्यातून आठवले ते रम्य कॉलेजचे दिवस.

खरे तर राजकारणात करेक्ट कार्यक्रम हे ब्रीदवाक्य घेऊन शिकार करणारे जयंतराव हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी ते उत्तम गायक असल्याची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली.’

‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे गाणे त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘संगीत संध्या’ कार्यक्रम आयोजित केला होता.

मैफील रंगल्यानंतर आप्तेष्टांनी जयंतरावांना एखादे आवडीचे गाणे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी अंतरा व कडवे आठवत असलेले किशोर कुमार यांचे गीत त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्याला अनेकांनी दाद दिली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago