टॉप न्यूज

Sushant death case :रियाने आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट!

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत च्या मृत्यूबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांत आणि  अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर रियाने आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट केल्या. अशी धक्कादायक माहिती सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी ने सीबीआयच्या चौकशीत दिली. (Siddharth Pithani allegedly claimed Rhea Chakraborty destroyed Hard Disks in Sushant’s House)

तीन आयटी प्रोफेशनल्सना संपर्क केला गेला होता, एक जण घरी आला होता. रिया किंवा इतर कुणी बोलावलं असेल. ज्यावेळी डाटा नष्ट केला जात होता, तेव्हा तिथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थ पिठाणी याने सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्या हार्ड डिस्कमध्ये कंपन्याचे महत्वाचे कागदपत्र होते. सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय आहे.

सीबीआय सुशांत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यात गुंतली आहे. क्वान कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया साहा ही सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण महत्त्वाचा दुवा ठरु शकते. जया साहा आणि दिशा यांनी क्वान कंपनीत एकत्र काम केले आहे.

जया 2009 पासून क्वानसाठी काम करत असून वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तर दिशाने 2018 मध्ये क्वानमध्ये सुरुवात केली होती. मात्र अल्प काळातच तिने नोकरी सोडली. त्यानंतर दिशाने 2019 मध्ये कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी जॉइन केली होती. आता सर्व प्रकरणात धक्कादाक माहिती समोर येत आहे.

राजीक खान

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

15 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

16 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

16 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

17 hours ago