महाराष्ट्र

मी तुमच्या उसाची राखण करणारा म्हसोबा,राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक म्हसोबा प्रत्येक गावात असतोच, आपण त्याला दरवर्षी खारा अथवा गोड नैवेद्य दरवर्षी दाखवतो. मी देखील तुमच्या उसाचे राखण करणारा म्हसोबाच असून पाच वर्षातून फक्त एकदाच मताचा नैवेद्य दाखवा म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. ते येडेमच्छिंद (ता. वाळवा) येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते.बावीस वर्षांमधील सहा निवडणुकीसाठी मला मतदारांनी पदरचे पैसे देऊन मतदान केले असून त्यांचा एवढा विश्वास माझ्यावर आहे.(I’m the one who protects your sugarcane, Raju Shetty’s emotional appeal)

मतदारांच्याकडून निवडणुकीसाठी मिळणारी मदत बंद होईल त्यावेळेस मी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेईन. प्रचार शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संदीप दबडे हे होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून सुरू झालेल्या प्रचार शुभारंभात बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की, आज खोके घेऊन पक्ष बदलणारे आणि साखर कारखानादार एकत्र येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड दबाव आणत असून कार्यकर्त्यांच्या वर खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत. परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे हे त्यांनी विसरू नये.

शेतकऱ्यांशी जो अडला त्या ठिकाणी राजू शेट्टी नडला हे समीकरण सगळ्यांना माहीत झाले आहे. येणारा शेतकऱ्याकडील पैसा हा पाझर तलावा सारखा असून तो सर्वत्र पाझरत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम शेतकऱ्यांच्या कडून होत असते.माझ्या दहा वर्षाच्या खासदारकीचा हिशोब विचारणारांनी प्रथम संसदेत जाऊन माझ्या कामाची कागदपत्रे बघावीत. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदर पाटील यांचेसह संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आकाश साळुंखे यांनी केले.

खासदारकीची निवडणूक माझी स्वतःची नसून आपण सर्वांनी ती आपली म्हणून स्वतःच्या खांद्यावर घेऊन लढवावी लागेल, शेतकऱ्याच्या कामाला दाम मिळावा म्हणूनच मी संसदेचा दरवाजा तिसऱ्यांदा ठोठावत असून मुकी आणि बहिरी असणाऱ्या संसदेला बोलते करण्यासाठीच आपला प्रतिनिधी तिथे आपली बाजू घेऊन भांडणारा असावा हे मतदारांनी लक्षात ठेवावे. वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष भास्करराव कदम यांनी रयत क्रांती संघटनेमधून स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेकडून राजू शेट्टी यांना जाहीर पाठिंबा. स्वाभिमानी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जयकुमार कोल्हे यांनी एक लाख नऊ हजार रुपये निवडणूक प्रचारासाठी राजू शेट्टी यांच्याकडे दिले.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

6 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

6 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

6 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

7 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

7 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

10 hours ago