व्हिडीओ

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे काय तर बारामती असं समीकरण आहे( Ajit Pawar distributes money in Baramati Rohit Pawar Allegation) पण दादा तुम्ही बारामतीचा बिहार बनवायचं ठरवलंल दिसतंय.

तुमच्या प्रचारसभेतील भाषणं आम्ही बारकाईनं ऐकली. तुम्हाला बारामतीचा विकास करायचाय म्हणून तुम्ही बेंबींच्या देठापासून बोंबलताय. पण हे सांगत असताना तुमच्या बोलण्यात नम्रता व विनयता दिसायला हवी. सगळ्या प्रचारसभांमधलं तुमचं बोलणं दमदाटीचं होतं. तुम्ही दादागिरीच्या भाषेत बोलत होता.

आता मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या चेल्याचपाट्यांनी तर कहरच केलाय. अर्थात त्यांनी तुमच्या मार्गदर्शनाशिवाय असं केलं असल असं कसा म्हणता येईल. अहो रात्री १२ वाजेपर्यंत तुम्ही बँक उघडी ठेवलीय. रोहित पवार यांनी अगोदरच तुमच्यावर आरोप केला होता. तुमच्याकडून प्रत्येक मताला अडिच हजार ते पाच हजार रूपये वाटले जात आहेत, असा त्यांनी आरोप केला होता. तुम्ही अडिचशे कोटी रूपये मतदांना वाटणार आहात असंही त्यांनी म्हटलं होतं. हा राजकीय आरोप म्हणून रोहित पवारांच्या त्या वक्तव्याकडं पाहिलं गेलं. पण रोहित पवारांचा हा आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवला. तुमचाच एक माणूस रंगेहात पकडला गेलाय. त्या गाडीत ५०० रूपयांच्या नोटा सापडल्या आहेत. तिथं पोलीस सुद्धा होते. त्याचा व्हिडीओ सगळीकडं व्हायरल झालायं. त्यात दिसतंय की, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलीय. पोलीस ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. बहुधा तुम्हाला घाबरून तुमच्या त्या माणसावर कारवाई करण्याची त्यांना हिंमत होत नसावी. हा सगळा प्रकार रोहित पवार मुद्दाम करीत आहेत, असा तुमच्याकडून प्रतिआरोप केला जातोय.

तुषार खरात

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

37 mins ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

2 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

19 hours ago