व्हिडीओ

संकटग्रस्त अजित पवारांना हवाय मनोज जरांगे पाटलांचा आधार

अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर पकडलं, अन् औरंगाबाद गाठलं. तिथून वाहनानं ते आंतरवली सराटी येथे पोचले (Ajit Pawar need Manoj Jarange Patil’s support in Baramati ). त्यांनी जरांगे पाटील यांची अर्धा तास वाट पाहिली. अर्ध्या तासानंतर जरांगे पाटील आले. जय पवार व मनोज जरांगे पाटील यांच्यात यावेळी चर्चा झाली. चर्चेचा तपशिल मात्र बाहेर आलेला नाही. मराठीत एक म्हण आहे. ‘ताकाला जावून भांडं लपवणं’. जय पवार हे मनोज जरांगे पाटील यांना का भेटायला गेले असतील हे समजायला कुठल्या जोतिषाची गरज नाही. खरंतर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच कोणत्याही उमेदवाराला आमचा पाठींबा नाही, ही भूमिका जाहीर केलेली आहे.

पण आरक्षणाच्या मुद्दयावर या निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवा. उमेदवार पाडा, असाही संदेश त्यांनी मराठा समाजाला दिलाय.आंदोलन काळात शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी सामान्य मराठा लोकांना बेदम मारहाण केली होती. अगदी वयोवृद्ध महिलांनाही झोडपून काढलं होतं. या अमानूष प्रकारानं आंदोलनात एक प्रकारे रॉकेल ओतण्याचंच काम पोलिसांनी केलं होतं. किंबहूना या मारहाणीच्या घटनेचा विपरीत परिणाम झाला, अन् जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आणखी धार चढली.

या आंदोलनाला शरद पवार यांचाच पाठींबा आहे. मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचा दलाल आहे, अशा प्रकारचे विखारी आरोप जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आले. हे सगळे आरोप सत्ताधारी पक्षाने, म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी केले. खूद्द अजित पवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात विधाने केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तर जरांगे पाटील यांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून टाकली होती. जरांगे पाटील तर छोटा माणूस आहे. त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना आम्ही धडा शिकवू अशा आशयाचं विधानही फडणवीस यांनी केलं होतं.जरांगे पाटील यांच्याशी असलेला हा पंगा बारामतीत जड जाईल, याचा अंदाज अजित पवार यांना आलेला असावा. त्यामुळे जरांगे पाटील यांचा आपल्याला पाठींबा असणं गरजेचं आहे. जरांगे पाटील यांनी जरी पाठींबा दिला नाही तरी किमान त्यांच्याशी आपलं काही वाकडं नाही, हा मेसेज मतदारांना देणं अजितदादांना गरजेचं वाटलं असेल. म्हणूनच मतदान हातातोंडावर आलेलं असताना अजितदादांनी आपल्या लेकराला म्हणजे जय पवारला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यास पाठविलेलं दिसतंय. या भेटीत नक्की काय चर्चा झाली ते उघड झालेलं नाही. पण मनोज जरांगेंसोबत झालेल्या भेटीतून बारामतीच्या मतदारांना योग्य तो मूकसंदेश जाईल, अशी अजित पवार यांची रणनिती असावी.धनगर समाज असो, किंवा मराठा समाज असो…. सगळ्याच समाजघटकांचा पाठींबा मिळविण्यासाठी अजितदादा अथक परिश्रम घेताहेत. मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याची खरी रंगत ही प्रचार संपल्यानंतरच असते. ती रंगत काय असते हे रोहित पवार यांनी रविवारच्या भाषणातून सांगून टाकलंय. अजितदादांनी मतदारांना पैसे वाटायला सुरूवात केलीय. अडिच हजार, साडेतीन हजार, साडेपाच हजार असा दर प्रत्येक मताला दिलाय. त्यासाठी तब्बल अडिचशे कोटी रूपये वाटले जातील, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. उमेदवारांमार्फत मतदारांना पैसे वाटले जातात हे ओपन सिक्रेट आहे. परंतु बारामतीसारख्या मतदारसंघातही असे पैसे वाटावे लागत असतील तर ते मोठं नवलंच आहे. अजितदादा खरंच पैसे वाटत असतील का नाही, हे आपल्याला माहित नाही. पण अजितदादांनी मतं मिळविण्यासाठी काय काय मार्गांचा अवलंब केलाय याचा अंदाज आपण लावू शकतो.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

10 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

12 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

14 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

15 hours ago