व्हिडीओ

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. (In Palghar, sexual harassment of a girl by birth parents)  लैंगिक छळाच्या कित्येक घटना रोज समोर येताहेत. तर ही घटना आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील. एका १७ वर्षीय तरूणीला जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून गरोदर करण्यात आले आणि त्यातून जन्मलेल्या बालकांना विकल्याची ही घटना आहे. अणि यातील धक्कादायक बाब अशी की या मुलीशी हे कृत्य करणारे कोणी दूरचे किंवा अनोळखी नसून तिचेच आईवडिल या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. ही घटना नेमकी काय आहे, जरा तपशीलात पाहूया…..

एका १७ वर्षीय तरूणीने दुस-या धर्मातील २३ वर्षीय तरूणाशी मैत्री करून त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले. जेव्हा तिच्या आई-वडिलांना ती गरोदर असल्याचं कळलं, तेव्हापासून तिच्या आयुष्यात अडचणी वाढल्या. शाळेचे मुख्याध्यापक, २ महिला डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक वकिल अशा उच्च स्थरावर कार्यरत असलेल्या लोकांसोबत मिळून त्या मुलीच्या बाळाला विकण्याचा कट रचला गेला. तिच्या पालकांसह या कारस्थानात भागीदार असणा-यांनी तिला पुन्हा गरोदर राहण्यास भाग पाडून तिच्या नवजात मुलाला विकलं.

२०२१ मध्ये त्या मुलीचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध असल्याची तिच्या पालकांना समजले. तिच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन नियमित तपासणी आणि प्रसुतीसाठी तिला खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गरोदरपणात तिचे आई-वडिल मुंबईत एका ठिकाणी तिला घेउन गेले. जिथे वकिलाने तिला काही कागदपत्रांवर सही करायला सांगितले होते. २४सप्टेंबर२०२१ ला तिने एका मुलीला जन्म दिला. जन्माच्या दुस-याच दिवशी तिला सामाजिक कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आले. या सर्व कटकारस्थानाची जाणिव होताच मुलीने पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली कि २ वेगवेगळ्या पूरूषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून तिला सलग दोनदा गरोदर राहण्यास भाग पाडलं गेलं आणि तिच्या नवजात बालकांना विकण्यात आलं. अशा केसेस मध्ये पॉस्को कायदा हा मुख्य भूमिका बजावतो. तर काय आहे हा पॉस्को कायदा जाणून घेऊयात. ..

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago