व्हिडीओ

काँग्रेसच्या काळात आमच्याकडे खूप विकास झाला, नरेंद्र मोदींचा काळ अत्यंत वाईट

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता  होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची  टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली.  (the voters will not get emotional in the lok sabha elections , but will vote after seeing the work of the goverment) यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी नेवासा  परिसरातील काही मतदारांसोबत  गप्पा मारल्या.
२०२४ निवडणुकीत पक्षफुटीच्या राजकारणानंतर मतदार आता फारच विचारपूर्वक उमेदवारांना निवडताना दिसताहेत.
मोदीने शेतीचं -कपाशीचं वाटोळं केले ,डिझेल-पेट्रोलचे भाव  कुठे गेले , दुधाचा बाजार काय आहे, राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेलं ५ रुपयांचं अनुदान कोणाला मिळालं अशा बऱ्याच सरकारला कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नांना मतदारांनीं लय भारीशी बोलताना मांडले.
शंकरराव गडाख यांचे शेतीबाबतीत नियोजन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे तर वाकचौरे गटविकास अधिकारी राहीलेले असल्यामुळे सरकारात जनतेच्या हिताची काम करून घेण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे . जो काम करेल त्यालाच मतदान करणार असे मत मतदारांनी व्यक्त केले.
लोखंडेंना मागच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा झाला असला तरी यावेळेस केलेलया कामाला लक्षात घेऊनच मतदान केलं जाईल असं परखड मत मतदारांनीं लय भारीशी बोलताना मांडले.
टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

5 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

6 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

7 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

10 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

11 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

13 hours ago