जागतिक

जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत?

जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. याचीच खबरदारी घेत भारतानेही सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील पहिली नाकावाटे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस भारतात लाँच झाली आहे. (World’s first covid nasal vaccine launched in India)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राजधानी दिल्लीत या लसीचे प्रक्षेपण केले. कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणाऱ्या हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने (Bharat Biotech) वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, ही लस नाकावाटे शरीरात पोहोचवली जाते. इनकोव्हॅक (iNCOVACC) असे या लसीचे नाव आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल अशी माहिती त्यांनी ट्विटर हॅंडलवरुन दिली.

सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. लसीसाठी 800 रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये ही लस 325 रुपयांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. लसीचे आरक्षण कोविन पोर्टलवरून केले जाईल. दरम्यान, 6 सप्टेंबर 2022 मध्ये डीजीसीआयने 18 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना आपत्कालीन वापरासाठी इनकोव्हॅक या कोरोना प्रतिबंध लसीच्या वापरास मान्यता दिली होती. यापूर्वी, डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टर लसीच्या वापरासाठी भारत बायोटेकने अधिकृत परवानगीसाठी अर्ज केला होता. साधारणत: प्रत्येक प्रौढ व्यक्तीला या लसीचे चार थेंब नाकावाटे दिले जातील.

हे सुद्धा वाचा : CORONA: आता जवळच्या मेडिकलमध्येही लसीकरण होणार सहज शक्य!

कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

VIDEO : चीनमधील कोरोना व्हेरिएंटचे तीन रुग्ण मुंबईत

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डसारख्या लस घेऊन झालेल्यांना ती बूस्टर डोस म्हणून दिली जाईल. यासह ती प्राथमिक लस म्हणूनही वापरता येईल. या लसीचे ४ थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील, अशी माहिती भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी दिली.

शिवाय, भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ‘इनकोव्हॅक’ ही नाकावाटे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोवॅक्सिन ही पहिली कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसही भारत बायोटेकनेच तयार केली होती.

Team Lay Bhari

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

2 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

3 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

3 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

5 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

5 hours ago