Categories: जागतिक

अखेर देवेंद्र फडणवीस होणार डॉक्टर; जपानच्या कोयासन विद्यापीठाने केली मानद डॉक्टरेटची घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यंतरी डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी दिली होती. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही डॉक्टरेट मिळाली नव्हती. पण जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान दौर्‍यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. कोया-चो येथील मेयर योशिया हिरानो हे आपल्या आगामी मुंबई दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करतील.

‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’
याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’ आज दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून जपान दौर्‍यावर गेले असता त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. आज पुन्हा विद्यापीठात गेले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो यांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आजच्या दौर्‍यात कोयासन विद्यापीठात जाण्यापूर्वी पहिली बैठक ही वाकायामा प्रिफिक्चरचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत झाली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्नेहभोज आयोजित केले होते. यावेळी कोया-चो येथील मेयर योशिया हिरानो, कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो, वाकायामाचे परराष्ट्र व्यवहार संचालक योशियो यामाशिता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र आणि जपान संबंधांवरील एक लघुपट यावेळी दाखविण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानसोबत निर्माण केलेल्या संबंधातून महाराष्ट्र आणि वाकायामा या दोघांमधील संबंध आणखी वृद्धिंगत झाले आहेत. संस्कृती, पर्यटन, व्यापार, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात आणखी काम करण्याची आमची इच्छा आहे. जपानमधील कंपनी आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात यावेत, यासाठी आवश्यक ती सर्वप्रकारची मदत राज्य सरकार करेल. जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या तज्ञांचा समावेश असलेला एक विशेष कक्ष राज्यात स्थापन करण्यात येईल आणि त्यामाध्यमातून गुंतवणूक वाढीला चालना देण्यात येईल.
हे सुद्धा वाचा
मंत्री गिरीश महाजन यांना आहेत ‘या’ सवयी, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !
कांद्याने केला सरकारचा वांदा; निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी चिडले
एसआरएतील अधिकाऱ्याच्या अनागोंदीमुळे झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ; शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

 वाकायामा प्रांताचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यावेळी बोलताना म्हणाले की, कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत आभारी आहोत. आता दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते आणि येणारे पर्यटकसुद्धा येथे भेट देतात. महाराष्ट्रातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काम करण्याची आमची इच्छा आहे. येथील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ घेऊन मी स्वत: महाराष्ट्रात येईन.

विवेक कांबळे

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago