33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईएसआरएतील अधिकाऱ्याच्या अनागोंदीमुळे झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ; शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

एसआरएतील अधिकाऱ्याच्या अनागोंदीमुळे झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ; शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

झोप़डपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) विभागात कार्यरत असलेले अभियांत्रिकी विभागाचे उपप्रमुख अभियंता रामभाऊ मिटकर यांच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक प्रकल्प सुरू झालेले नाहीत. त्यामुळे अनेक झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ज्या विकासकांनी प्रकल्पाची कामे हाती घेतली नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची देखील कारवाई केलेली नाही. त्यामुळे मिटकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच त्यांना मुदवाढ न देता त्यांना मुंबई म्हाडाच्या सेवेमध्ये परत पाठवण्यात यावे अशी मागणी झोपडपट्टी मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तथा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आर. डी. यादव यांनी केली आहे.

यादव यांनी म्हटले आहे की, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विभागातील 597 बंद प्रकल्पांपैकी 10 टक्के बंद प्रकल्प अद्यापपर्यंत चालू झालेले नहीत. हे प्रकल्प शासनाच्या नियमानुसार कार्यान्वित करण्याकरिता संबंधित विकासकास या योजनेतून निलंबित करण्याकरिता तसेच विकासकाला काळ्या यादीमध्ये टाकण्याबाबत कोणतीही कारवाई अभियांत्रिक विभागकडून केलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच त्यांना घरभाड्यापोटी 519 कोटींची थकबाकी मासिक भाडे मोठ्‌या प्रमाणात प्रलंबित आहे. त्यामुळे झोपडीधारकांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. काही झोपडीधारकांचीआर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे.

सदर गोष्टीस झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अभियांत्रिक विभाग, जबाबदार आहे अभियांत्रिक विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे संबंधित विकासकाशी हितसंबंध जपल्यामुळे कारवाई करत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपप्रमुख अभियंता (अभियांत्रिक विभाग) रामभाऊ मिटकर यांना बेकायदेशीरपणे मुदत वाढ दिल्याची याचिका उच्च न्यायालयामध्ये अर्थ सामाजिक संस्थेने केली असल्याचे बातम्यांमधून समोर आले असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 

मंत्री गिरीश महाजन यांना आहेत ‘या’ सवयी, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

एशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज; कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ खेळाडूंना संधी

धनंजय मुंडेंनी ‘या’ योजनेची वाढविली उंची !

या सर्व बाबींवरून असे दिसून येते की, अभियांत्रिक विभागाचे प्रमुख सदर सर्व अनागोंदीला जबाबदार असून त्यांचे अधिकाऱ्यांवर काम करून घेण्याची शैली संशयातपद आहे. त्यामुळे रामभाऊ मिटकर यांच्यावर शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2013/ प्र.क्र.8/18 (2.9 का) दि. 18/जानेवारी 2013 नुसार मधील 6. नुसार शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना मुदतवाढ न देता मुंबई म्हाडाच्या सेवेमध्ये परत पाठवण्यात यावे अशी मागणी यादव यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी