जागतिक

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज सात दिवस झाले. यात हमासचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रचंड मनुष्यहानी झालीच शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. आता हे कमी म्हणून की काय, उत्तर गाझा पट्टा २४ तासांत खाली करा, असा इशारा काल इस्रायलने दिला होता. त्यामुळे आता इस्रायल उत्तर गाझा पट्ट्याला लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आठवडाभरात इस्रायलच्या प्रत्युत्तरात गाझा पट्ट्यातील १,७९९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या हल्ल्यात १३०० इस्रायली नागरिक जीवाला मुकले आहेत. या पार्श्वभूमीवर आता रशियाने मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. एकीकडे पॅलेस्टिनींना मध्य पूर्वेतून वाढणारा पाठिंबा आणि अमेरिका, भारत आदी देशांचा इस्रायलला पाठिंबा अशी परिस्थिती आहे.

गाझामधील १,७९९ नागरिकांचे बळी

गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने इस्रायलवर पहिला हल्ला केला. सुमारे पाच हजार रॉकेट इस्रायलवर सोडली. मात्र, इस्रायलच्या डोम प्रणालीने यातील बहुतांश रॉकेट निकामी केले. तरीही इस्रायलची प्रचंड हानी झाली. सुरक्षायंत्रणा भेदून झालेल्या हल्ल्लयामुळे इस्रायलकडून पुढील तीन ते चार तासांत मोठी कृती घडली नाही. त्यानंतर मात्र सर्व ताकदीनिशी इस्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या सात दिवसांत गाझा पट्ट्यातील १,७९९ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात ५८३ बालके आणि ३५१ महिलांचा समावेश आहे. तर इस्रायलच्या पलटवारामुळे गाझामधील विस्थापितांची संख्या ४ लाख २३ हजारावर गेली आहे. शिवाय ७ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृत्युचे तांडव सुरू असतानाही हमास आणि इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत.

डॉक्टर विदाऊट बॉर्डर

गाझा पट्ट्यातील जखमींवर उपचार करण्यासाठी ३०० हून अधिक डॉक्टर कार्यरत आहेत. हे सगळे डॉक्टर आंतरराष्ट्रीय मानवतावादी गटाचे असून ते ‘डॉक्टर विदाऊट बॉर्डर’ या सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. ना राहायला घर, जखमींची वाढती संख्या, त्यातच इस्रायलकडून वाढते हल्ले यामुळे जखमींवर उपचार करणेही अवघड झाले आहे. दरम्यान, हमासच्या हल्ल्यात १३०० नागरिक मारले गेल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. शिवाय ३ हजार २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २५८ सैनिकांचा समावेश आहे.

पुतीन मध्यस्थीसाठी तयार

इस्रायली सैन्याच्या गाझा पट्ट्यातील वाढत्या आक्रमणामुळे मृतांची संख्या वाढत आहे. म्हणूनच आता हे युद्ध वाढू नये यासाठी रशिया मध्यस्थीसाठी तयार असून कुणी मध्यस्थी करणार असेल तर त्यांच्या प्रयत्नांनाही सहकार्य करण्यात तयार असल्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

हज्बुल्लाह इस्रायलविरोधी लढण्यात तयार

इस्रायलवर हमासकडून हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेबनॉनमधूही इस्रायलवर हल्ले करण्यात आले होते. लेबनॉनमधील हज्बुल्लाह या संघटनेने इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमाससोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे इस्रायलच्या सीमा आता अधिक शस्रसज्ज कराव्या लागतील.

हे ही वाचा

भारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रोन्सची भेदक नजर

मेट्रो कारडेपो कांजूरमार्गमध्येच, मग आम्हाला विरोध का केला? आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

१९ हजारांहून जास्त महिला राज्यातून बेपत्ता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

 

इराकमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने

दरम्यान, पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ शुक्रवारी हजारो इराकी नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी इस्रायलविरोधात घोषणा देतानाच अमेरिकेचाही निषेध केला. इराकमधील तहरिर चौकात इस्रायलविरोधात ही निदर्शने करण्यात आली.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago