29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रीडाभारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रोन्सची भेदक नजर

भारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रोन्सची भेदक नजर

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट महामुकाबल्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. उद्या शनिवारी, (14 ऑक्टोबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते येणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) क्रिकेट चाहत्यांना खुशखबरी देत या सामन्यासाठी अतिरिक्त तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ख्याती असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरण्याची शक्यता आहे. अशातच, या हाय वोल्टेज सामन्यासाठी सुरक्षा यंत्रणादेखील मजबूत करण्यात आली आहे. स्टेडियम परिसराला सुरक्षा छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून स्टेडियम परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्सची मदत घेतली जाणार आहे.

भारत-पाकिस्तान लढतीदरम्यान समाजविघातक घटकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोन्सचा खुबीने वापर करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात सुरक्षेसाठी 7 हजार पोलीस आणि 4 हजार सुरक्षारक्षक असे एकूण 11 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.


काय विशेष आहे या ड्रोन्समध्ये?

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान वापरण्यात येणारे ड्रोन्स एकाच वेळी 12 तास उडू शकतात. याशिवाय, जमिनीपासून तब्बल 120 मीटर उंचीवर उडण्याची त्यांची क्षमता आहे. स्टेडियमपासून 5 किलोमीटर परिसरात या ड्रोन्सचे लक्ष असेल. या ड्रोन्समध्ये एचडी कॅमेरा (HD Camera) बसवण्यात आले असून ड्रोन्सद्वारे चित्रित केलेले व्हिडिओ हे उत्तम दर्जाचे असतील.

अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “भारत-पाक सामन्यादरम्यान सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे ड्रोन्स 12 तासांपर्यंत आणि 120 मीटर उंचीवर उड्डाण करू शकतात. तसेच ते स्टेडियमच्या सभोवतालच्या 5 किमी अंतरावरील घडामोडी टिपू शकतात. असामाजिक घटकांना पकडण्यासाठी या ड्रोन्सचा वापर करण्यात येणार आहे. या ड्रोन्समध्ये फूल एचडी कॅमेरा बसवण्यात आला असून स्टेडियम आणि जवळपासच्या सुरक्षेसाठी त्याचा वापर केला जात आहे.”


11 वर्षानंतर भारतात वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या क्रिकेटच्या महासंग्रामातील सर्वात लोकप्रिय सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानचा सामना उद्या शनिवारी (14 ऑक्टोबर) होणार आहे. दुपारी 2 वाजेपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी देशातील बड्या राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेक जण उपस्थित लावणार आहेत.

टीम इंडियाने या वर्ल्ड कपमधील विजयाची सुरुवात दिमाखात केली असून रविवारी, (8 ऑक्टोबर) झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कांगारुंचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला होता. विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या तुफानी खेळीमुळे भारताने हा विजय मिळवला. बुधवारी, (11 ऑक्टोबर) झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 8 विकेटने विजय मिळवला. जसप्रीत बूमराहच्या 4 विकेट्सच्या जोरावर तसेच कर्णधार रोहित शर्माच्या तुफानी शतकी खेळीमुळे भारताला सहज विजय प्राप्त झाला. रोहितने 131 धावा काढल्या तर विराट कोहलीने नाबाद 55 धावांची खेळी केली.

हे ही वाचा 

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बॉलिवूडसह पाकिस्तानी पत्रकारांची उपस्थिती

शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात?

वर्ल्डकपचा किंग रोहित शर्मा! अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकून तब्बल ‘इतके’ रेकॉर्ड्स केले नावावर

असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बूमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव

असा असेल पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, अब्दुल्ला शाफिक, सौद शकील, शादाब खान (उपकर्णधार), इफ्तीकार अहमद, सलमान आघा, मोहम्मद नवाज, उसमा मीर, हारिस रौफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वासिम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी