31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबई१९ हजारांहून जास्त महिला राज्यातून बेपत्ता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

१९ हजारांहून जास्त महिला राज्यातून बेपत्ता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

‘महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाच महिन्यांत १९ हजारांहून जास्त महिला राज्यातून बेपत्ता होणे चिंतेची बाब आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. शुक्रवारी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही चिंता व्यक्त केली. राज्यातील आरोग्य, शिक्षण, कंत्राटी पद्धतीने पदभरती आदी विविध विषयांवर पवार यांनी मते मांडली आहेत. ‘कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केल्यास शिक्षणाचा दर्जा घसरणार, 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा सरकार बंद करण्याची तयारी केली आहे. या शाळा बंद झाल्यावर मुलींना चालत जावे लागेल, शासकीय शाळा दत्तक देण्याची सरकारची योजना आहे. पण अशा शाळांचा खासगी व्यक्ती खासगी कामासाठी वापर करतील,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधीची चर्चा सुरू आहे. उपराजधानी नागपूरसारख्या शहराबाबत वेगळ्या पद्धतीने बोलले जाते. त्याविषयी माहिती घेतल्यावर काही गोष्टी समोर आल्या. पावसाळी अधिवेशनात आमच्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ५५३ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. यामध्ये १८ वर्षांखालील १,४५३ मुलींचा समावेश आहे. ही संख्या पाहिल्यानंतर स्थिती अत्यंत गंभीर आहे हे कळते. राज्य सरकार आणि गृहखातं याची गांभीर्याने नोंद घेईल आणि उपाययोजना करेल अशी अपेक्षा आहे.’ असेही पवार म्हणाले.

शासकीय भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मला जे शिष्टमंडळ भेटले त्यांनी काही मुद्दे माझ्याकडे मांडले. पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही भरती ११ महिन्यांसाठीच असल्याने पुढे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे. कंत्राटी पद्धतीचा कार्यकाळ ११ महिन्यांचा असल्याने ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या कशा पूर्ण होतील, असाही प्रश्न आहेच, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरुपी भरती केली जावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या भरती प्रक्रियैत पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा 

पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांचे कान टोचले!
टोलनाक्यांच्या सुविधांवरून राज ठाकरे आक्रमक
मी पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढली आहे – सुप्रिया सुळे

कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक भरतीने शिक्षणाचा दर्जा घसरणार आहे. पंढरपूरमधील शाळेचा विकास करायचे सरकारने ठरवले आहे. एक कंपनी शाळा चालवायला घेणार आहे. ही शासकीय संपत्ती खासगी व्यक्तीकडे गेल्यास ते त्याचा वापर स्वतःसाठी करतील. शासकीय शाळा दत्तक देण्याची सरकारची योजना योग्य नाही. राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.’ असेही पवार म्हणाले.

‘सरकार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या मागे लागलेली आहे. पण त्यामुळे मुलींना चालत शाळेत जावे लागेल. ज्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी काम केले. त्यांच्या राज्यात काहीतरी चुकीचे घडत आहे’ असे पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी