निवडणूक

विधानपरिषदेवर चालणार कोणाची जादू ?

टीम लय भारी

मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे एकंदरीत ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे ५ उमेदवार तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे आमदार असल्याने या दोन्ही पक्षांच्या दोन्ही जागा सहज निवडून येऊ शकतात. परंतु काँग्रेसकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या विजयावर टांगती तलवार आहे. त्यामुळे काँग्रेसने मित्र पक्ष आणि अपक्ष यांच्या मदतीने अतिरिक्त मते मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तसेच भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयासाठी लागणारी मते देखील कमी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.

दहाव्या जागेसाठी भाजप वि. काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात
विधान परिषदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस पहावयास मिळत आहे. प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपला 21 मतांची गरज आहे. तर भाई जगताप यांना विजय मिळवण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेकडे पहिल्यांदा 4 मतं मागितली आहेत. या शिवाय समाजवादी पक्षाच्या दोन मतांपैकी 1 मत काॅंग्रेसला तर दुसरं मत रा. काॅंग्रेसला मिळणार आहे.

नाराज दिलीप मोहितेंची मतदानाला हजेरी
पुरेसा विकास निधी न मिळाल्यामुेळे नाराज असलेले आणि नाॅट रिचेबल असलेले दिलीप मोहिते देखील मतदानाला पोहोचले. तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात ते नाराज होते. ‘अजित पवारांना भेटून चर्चा झाल्यानंतर मतदान करेन. अजित पवार म्हणतील त्याप्रमाणे मी वागेन,’ असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला.

मतदानाला येताना रवी राणांनी आणली हनुमान चालीसा
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले रवी राणा हातात हनुमान चालीसाची प्रत घेवून मतदानाला पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्री आपल्यावर दबाव टाकत आहेत. ठाकरे सरकार कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. तसेच मला अटक करण्यासाठी अमरावतीवरून पोलीस मुंबईला आल्याचे त्यांनी सांगितले. 56 वर्षांनंतर तुम्ही जनतेला खोटे आश्वसन दिले. बाळासाहेबांनी केले नाही ते तुम्ही केले. दोन दिवस मुंबईबाहेर राहिलो. कारण सरकार दबाव टाकून मला कोणत्या ना कोणत्या कारणाने अटक करेल ही भीती होती. यामुळे मी परस्पर विधान भवनात आलो, असे रवी राणांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

धनंजय मुंडेंना कौतुक वंचितांच्या मुलांच्या कामगिरीचे !

ओबीसी आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र : नाना पटोले

पूनम खडताळे

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

17 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

17 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

19 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

21 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

21 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

22 hours ago