क्रिकेट

भारत विरुद्ध पाक आज पुन्हा होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट?

रविवारी (10 सप्टेंबर) प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या आशिया चषकातिल बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज सोमवारी (11 सप्टेंबर) रोजी होणार आहे. परंतु, आजही पावसाची शक्यता वर्तवल्याने, आजतरी हा सामना होणार का नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी 2 सप्टेंबरला पल्लीकेले स्टेडियम येथे झालेल्या भारत-पाकिस्तान साखळी सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताचे सामने श्रीलंकेत खेळवणे ही मोठी चूक ठरताना दिसत आहे.

पाकिस्तान यजमानपद भूषवत असलेल्या यंदाच्या आशिया चषकातील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेआधी ही स्पर्धा तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. परंतु, सामन्यादरम्यान पाऊस सतत खोडा घालत असल्याने भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजिस आमंत्रित केले. सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी धुवाधार फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. साखळी सामन्यात घातक गोलंदाजी करणाऱ्या शाहीन शाह आफरीदी याची जबरदस्त धुलाई रोहित आणि गिल यांनी केली. रोहित 56 धावांवर असताना शदाब खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर, शुभमन गिलही 58 धावांवर असताना शाहीन अफरीदीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर, विराट कोहळी आणि के एल राहुल यांनी भारताचा डाव सावरायला सुरवात केली. धावफलकावर 24.1 षटकांत 2 बाद 142 धावा असताना पाऊस पडला आणि खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर खेळपत्तीची पाहणी करण्यात आली. त्यानुसार, 9 वाजता प्रत्येकी 34 षटकांचा सामना खेळवण्याचे ठरले. परंतु, पाऊस पुन्हा सुरू झाल्याने सामना राखीव दिवशी खेळवण्याचे ठरले.

हे ही वाचा 

खेळाडूंच्या जर्सीवर आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’? सेहवागची बीसीसीआयकडे विनंती

नीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत

आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?

आज राखीव दिवशी 3 वाजता सामन्याला पुन्हा सुरुवात होणार असून आजही पावसाने व्यत्यय आणल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येईल.

लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago