क्रिकेट

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

आयपीएलच्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. यंदा सर्वाधिक चर्चा होणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा समावेश आहे. चेन्नई म्हटलं की महेंद्रसिंग धोनी हे समीकरण आता पक्कं झालं आहे. यंदाच्या हंगामात पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा संघाचा दुसरा सामना लखनौविरुद्ध झाला. हा सामना चेन्नईने 12 धावांनी जिंकला. मात्र यानंतर धोनीने थेट कर्णधारपद सोडण्याची धमकी दिली आहे. सामन्यात असं काय घडलं की, धोनीने थेट कर्णधारपद सोडण्याची धमकी दिली.

चेन्नई विरुद्ध लखनौचा सामना संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना धोनी म्हणाला की, वेगवान गोलंदाजीत आम्हाला थोडी सुधारणा करावी लागेल. आमच्या वेगवान गोलंदाजांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गोलंदाज काय करत आहेत हे पाहणे, त्यामुळे आमचे वेगवान गोलंदाज काय करू नये हे शिकू शकतात. त्यांना नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड्स टाकू नयेत किंवा त्यांना नवीन कर्णधारासोबत खेळावे लागेल. हा माझा दुसरा इशारा आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास मी कर्णधारपद सोडेन, धोनीने कर्णधारपद सोडण्याची चेतावणी दिल्यामुळे चेन्नई संघासह सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

सोमवारी झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. मोठी धावसंख्या उभारुनही चेन्नई संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही. कारण चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी भरपूर अतिरिक्त धावा दिल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी 13 वाइड आणि तीन नो बॉल फेकले, तुषार देशपांडे तिन्ही नो बॉल टाकले. या अतिरिक्त धावांमुळे धोनी प्रचंड संतापला.

दरम्यान लखनौविरुद्ध चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले. कारण दीपक चहरने चार षटकात पाच वाईड्ससह 55 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचवेळी तुषारने चार षटकांत चार वाइड आणि तीन नो बॉलसह 45 धावा लुटल्या. मात्र त्याने दोन विकेट्सही घेतल्या. बेन स्टोक्सने एका षटकात 18 धावा दिल्या. तर हंगरगेकरने दोन षटकात 24 धावा दिल्या. स्पिनर्सच्या जोरावर चेन्नईने सामना जिंकला. मोईन अलीने चार षटकांत २६ धावा देत चार बळी घेतले. सँटनरने चार षटकांत 21 धावा देत एक बळी घेतला. मात्र कित्येकदा बोलूनही संघाची कामगिरीत सुधारणा होत नसल्याने धोनीने ही गंभीर चेतावणी दिली आहे.

हे सुद्धा वाचा:

आजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!

IPL 2023: अरिजितने धोनीसमोर नतमस्तक होऊन पायाला केला स्पर्श!

‘औकात मे रहो पाकिस्तानियो’: पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

Dhoni gave warning to leave the captaincy of Chennai super kings!, MS Dhoni, Chennai superkings

Team Lay Bhari

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

24 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

49 mins ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

2 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago