क्रिकेट

अटीतटीच्या लढतील भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील (India vs New Zealand, 1st ODI) पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या संघावर मात करत मालिकेतील पहिला विजय मिळवला. मात्र दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली. सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत अतिशय तडाखेबाज खेळी केली. मात्र न्यूझीलंडने देखील तेवढीच तगडी खेळी करत भारतीय संघासमोर आव्हान उभे केले होते. मात्र अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळविला. (India vs New Zealand, 1st ODI India’s thrilling win over New Zealand will be a tough match)

या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार खेळी केली. मात्र 34 धावांवर रोहित शर्माला प्रतिस्पर्धी संघाने तंबूत पाठवले. त्यानंतर शुभमन गिल याने वादळी खेळी करत १४९ चेंडूत १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत व्दिशतक (२०८ धावा) केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील आपली चमक दाखवू शकला नाही, त्यापाठोपाठ आलेला ईशान देखील लगेचच बाद झाला. मात्र शुभमनने आपली फटकेबाजी सुरुच ठेवत भारतीय संघाच्या धावांचा डोंगर उभारला होता. इशान पाठोपाठ सुर्या आणि हार्दिक पांड्या यांनी शुभमनला साथ दिली आणि शुभमनचे व्दिशतक झळकले. तसेच भारतीय संघाने तब्बल ३४९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर उभे केले होते.

न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला मैदानात उतरल्यानंतर त्यांच्यासमोर विजयासाठी ३५० धावांचे मोठे लक्ष्य भारताने ठेवले होते. सुरुवातीलाच न्युझीलंडच्या संघाची मैदानात पिछेहाट सुरू झाली होती. कॉन्वे अवघ्या १० धावांवर बाद झाला. तर फिन अॅलनने कशातरी ४० धावा पूर्ण करत तो तंबूत परतला. न्यूझीलंडच्या संघाची निराशाजनक खेळी सुरु असताना सातव्या विकेटसाठी ब्रेसवेल आणि मिचेल सॅंटनर यांनी मात्र संघाला सावरुन धरण्यात हातभार लावला. या जोडीने १०२ चेंडूमध्ये १६२ धावा उभारल्या दोघांनी ही अर्धशतक झळकविले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात शुभमन गिलचा डबल धमाका

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सिस्टर आंद्रे यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन

दरम्यान भारतीय संघापुढे कडवे आव्हान उभे राहत असताना हार्दिक पंड्याने भारतीय संघासाठी विजयाचा मार्ग सोपा केला. त्याने ४९ व्या षटकात ४ धावा देत १ बळी घेतला. त्यानंतर शार्दुलने ठाकुरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला, त्यामुळे भारतीय संघाची धाकधूक वाढली होती. मात्र शार्दुलने ब्रेसवेलला पायचीत केले त्यावेळी न्यूझीलंडला ३३७ धावा करता आल्या. आणि एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाना आपल्या नावावर केला.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

11 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

11 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

11 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

12 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

17 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

18 hours ago