क्रिकेट

भारतीय संघाचा न्यूझीलंडवर १६८ धावांनी मोठा विजय

भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या टी-२० तिसऱ्या सामन्यात (India vs New Zealand 3rd T20) बुधवारी (दि.१) भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव करत मालिका जिकंली. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गील याच्या नाबाद दमदार शतकी (६३ चेंडूत १२६ धावा) खेळीने न्यूझीलंड समोर २३५ धावांचे आव्हान ठेवले होते. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 16 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाने अगदी सहजपणे न्यूझीलंडच्या संघाचा धुव्वा उडविला. न्यूझीलंडचा संघ १३ व्या षटकात ६६ धावा करुन गारद झाला. (India vs New Zealand 3rd T20 India won by 168 runs against New Zealand)

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीला सुरुवात केली. मात्र सलामीला आलेला ईशान किशन अवघी एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गील याला राहूल त्रिपाठीने (४४ धावा) चांगली सोबत दिली. तसेच हार्दिप पांड्या याने देखील १७ चेंडूत ३० धावा काढल्या. भारतीय संघाने ४ बाद २३५ धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर उभे केले.

हे सुद्धा वाचा

सौदी अरेबिया करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालणा देणारा अर्थसंकल्प : उज्ज्वला हाके

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

त्यानंतर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकापाठोपाठ एक बळी देत १३ व्या षटकातच गारद झाला. हार्दिक पांड्या याने पहिल्या षटकामध्येच फिन एलन (३) याला बाद केले. तर दुसऱ्या षटकामध्ये डेवोन कॉन्वे (१) आणि मार्क चॅपमेन याचा शुन्य धावात अर्शदिप सिंह याने बळी घेतला. त्यानंतर तिसऱ्याच षटकात हार्दिक ने ग्लेन फिलिप्स याला बाद केले. मायकल ब्रेसवेल हा पाचव्या शतकात बाद झाला. सहव्या षटकात न्यूझीलंडने पाच बळी ३० धावा केल्या होत्या.

शिवम मावी याने नवव्या षटकात सेटनर (१३) आणि इश सोडी (०) याला बाद केले. तर दहाव्या षटकात हार्दिक पांडे याने लॉगी फर्गुसन याला शुन्य धावांवर बाद केले. त्यानंतर ६६ धावांवर डेरल मिचेल याला ३५ धावांवर बाद झाला. आणि न्यूझीलंडचा संघ १३ व्या षटकात गारद झाला.

 

 

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

3 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

4 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

4 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago